भारताची स्टार क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर आता सांभाळणार 'डीएसपी'ची जबाबदारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Mar-2018
Total Views |


 
भारताची स्टार क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर हिला पंजाब पोलिसांनी 'डीएसपी' या पदावर नियुक्त केले आहेत. नुकताच तिने डीएसपी पदाचा कार्यभार सांभाळला. तसेच याबद्दल आनंद व्यक्त करत तिने पंजाब पोलिस, केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचे आभार मानले.
 
 
 
 
 
या आधी हरमनप्रीत कौरला रेल्वे मध्ये दाखल करण्यात आले होते, मात्र तिची इच्छा पंजाब पोलिसांसोबत काम करण्याची होती त्यामुळे तिने पंजाब पोलिसांसोबत काम करण्याची संधी स्वीकारली.
 
या पदामुळे जबाबदारी वाढली आहे, आणि मी ती यशस्वीपणे सांभाळेन असा विश्वास हरमनप्रीत कौरने व्यक्त केला आहे.
@@AUTHORINFO_V1@@