व्यसनमुक्तीसाठी भंडारा जिल्हा प्रशासनाचा एल्गार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Mar-2018
Total Views |
 
 
 

 
 

प्रत्येक विभागात जावून जागृती

व्यसनाचे दुष्परिणामाची केली जाणीव

प्रशासनाचे अभिनव अभियान
 


भंडारा :  तंबाखुजन्य व मादक पदार्थाच्या सेवनामुळे होणाऱ्या दुर्धर आजारापासून अधिकारी कर्मचाऱ्यामध्ये जागृती करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यसनाविरुध्द एल्गार पुकारला आहे. जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या मार्गदर्शनात निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांच्या कल्पकतेतून प्रशासनाने अभिनव अभियान सुरु केले आहे. तंबाखु, खर्रा, गुटखा व सिगारेट या व्यसनाची माहिती व दुष्परिणाम सांगण्यासाठी प्रत्येक विभागात जावून जागृती अभियानाचा आज जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. यावेळी कलापथकाच्या माध्यमातून व्यसनाचे दुष्परिणाम सांगण्यात आले.
 
 
आरोग्य विभागाच्या अहवालानुसार भारत तंबाखु उत्पादनामध्ये तसेच तंबाखु सेवनामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशात चार लाख हेक्टर एवढा भू-भाग तंबाखुच्या शेतीसाठी वापरला जातो. १.३ कोटी एवढे लोक तंबाखुशी निगडित क्षेत्रात काम करतात तर ५०  लक्ष लोक हे बिडी तयार करण्याच्या उद्योगाशी निगडित आहेत. ज्यात लहान मुलांचा समावेश अधिक आहे. भारतात २७४.५ दशलक्ष लोक तंबाखुचे सेवन करतात. १६३.७  दशलक्ष लोक धुररहित तंबाखुचा वापर करतात व ६८.९  दशलक्ष लोक धुम्रपान करतात.
 
 
 
 
महाराष्ट्रातील तंबाखु सेवनाचे प्रमाण अतिशय चिंताजनक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार महाराष्ट्रात ४२.५  टक्के पुरुष व १८.९  टक्के स्त्रिया तंबाखुचे सेवन करतात. १३  ते १५  वर्ष वयोगटामध्ये १३  टक्के विद्यार्थी तंबाखुचा वापर करतात. एकूण विद्यार्थ्यांपैकी १०.२ टक्के मुले व ११.१  मुली तंबाखुचा वापर करतात. तरुण मुले सरासरी वयाच्या १७, १८  वर्षापासून तंबाखु सेवन सुरु करतात. २५.८  टक्के मुली त्यांचे वय  १५  वर्ष होण्याअगोदरच तंबाखु सेवन सुरु करतात. 
 
 
  
@@AUTHORINFO_V1@@