छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात १० नक्षलवाद्यांचा खात्मा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
 
बिजापूर : तेलंगणा पोलिसांना आणि छत्तीसगड पोलिसांना आज मोठे यश हातात आले. तेलंगणा पोलीस आणि छत्तीसगड पोलीस यांनी मिळून केलेल्या एका शोध मोहिमेत आज तब्बल १० नक्षलवाद्यांचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून दोन्ही राज्यांचे पोलीस नक्षलवाद्यांचा तपास घेत होते. त्यामुळे आज अचानक शोध घेत असतांना १० नक्षलवाद्यांना ठार करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
 
 
 
 
तेलंगणा आणि छत्तीसगड या दोन्ही राज्यांच्या सीमेवर हा एन्काऊंटर करण्यात आला आहे. दोन्ही राज्यांच्या पोलिसांनी मिळून एक शोध मोहीम हाती घेतली होती त्यामुळे आता या शोध मोहिमेला यश मिळाले आहे. अजून देखील काही महत्वाच्या भागांमध्ये दोन्ही राज्यांच्या पोलिसांकडून नक्षलवाद्यांचा कसून शोध घेतला जात आहे.
 
 
 
 
आजचे हे यश दोन्ही राज्यांच्या पोलिसांसाठी महत्वाचे यश मानले जात आहे. तब्बल १० नक्षलवाद्यांना ठार केले असल्याने पोलिसांचे हे मोठे यश मानले जात आहे. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@