भाजपा प्रदेश संघटनमंत्रीपदी विजय पुराणिक नियुक्त

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Mar-2018
Total Views |


 
 
मुंबई : भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्राच्या प्रदेश सरचिटणीस (संघटन) पदी विजय मनोहर पुराणिक यांची भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी नियुक्ती केली असून या नियुक्तीबद्दल प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. अमित शाह यांनी पुराणिक यांची महाराष्ट्रासोबत गोव्याच्याही भाजपा प्रदेश सरचिटणीस ( संघटन ) पदी नियुक्ती केली आहे.
भाजपने गेले काही महिने रिक्त असलेल्या महाराष्ट्र प्रदेश संघटनमंत्री पदावर नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. माजी संघटनमंत्री रवींद्र भुसारी यांनी राजकीय क्षेत्रातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतल्यावर हे पद रिक्त झाले होते.
 
 
 
प्रदेश संघटनमंत्रीपदी नियुक्ती होण्यापूर्वी विजय पुराणिक यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाराष्ट्र, गुजरात व गोवा या पश्चिम क्षेत्राचे प्रचारक म्हणून जबाबदारी होती. विजय पुराणिक यांनी आपले अभियांत्रिकीचे शिक्षण झाल्यानंतर १९८७ सालापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून कामाला सुरुवात केली. मुरबाड तालुका प्रचारक, धुळे आणि नगर जिल्हा प्रचारक, संभाजीनगर व लातूर विभाग प्रचारक, देवगिरी प्रांत सह प्रांतप्रचारक व प्रांत प्रचारक तसेच पश्चिम क्षेत्र सहप्रचारक व प्रचारक या जबाबदाऱ्या त्यांनी आजवर सांभाळल्या आहेत. त्यानंतर आता विजयराव पुराणिक यांनी राजकीय क्षेत्रातील कारकीर्दीचा प्रारंभ केला असून भाजपच्या पक्ष संघटनेतील अत्यंत महत्वाचे मानले जाणारे पद पुराणिक यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.
@@AUTHORINFO_V1@@