साडेतीन हजार कोटीची थकबाकीवसुलीसाठी धडक मोहिम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Mar-2018
Total Views |
 

साडेतीन हजार कोटीची थकबाकी

वसुलीसाठी  धडक मोहिम

जळगांव  १७ मार्च 

 वीज देयकांची वाढती थकबाकी हे महावितरण समोरील एक प्रमुख आव्हान आहे. मार्च अखेर महावितरणने चालू वीज देयकासह थकीत देयकांच्या वसुलीची मोहिम अधिक तीव्र केली आहे. सर्व थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करण्याचा पवित्रा महावितरणने घेतला आहे. त्यामुळे ग्राहकांनी थकीत व चालू वीज देयके भरणा करुन अखंडीत वीज सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता श्री. ब्रिजपालसिंह जनवीर यांनी केले आहे.
 
 

जळगांव परिमंडळातील ५ लक्ष ९६ हजार २८० ग्राहकांकडे ३ हजार ६९९ कोटी ३७ लक्ष रुपये वीज देयक थकीत आहे. घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील २ लक्ष ५२ हजार ७२६ ग्राहकांकडे ४९ कोटी १६ लक्ष रुपये वीज देयक थकीत आहे. सार्वजनिक पाणी पुरवठा ३ हजार ८८२ ग्राहकांकडे २५७ कोटी १८ लक्ष रुपये, सार्वजनिक सेवा २ हजार ६२० ग्राहकांकडे १ कोटी ६० लक्ष रुपये, पथदिव्यांच्या ४ हजार ८२१ ग्राहकांकडे ३७० कोटी ४४ लक्ष रुपयांची वीज देयके थकली आहेत. कृषीपंप ३ लक्ष ३१ हजार ५५७ ग्राहकांकडे ३ हजार १९ कोटी ३४ लक्ष, यंत्रमाग ३२५ ग्राहकांकडे १ कोटी ४२ लक्ष रुपयांची वीज देयके थकली आहेत. जळगांव मंडळातील ३ लक्ष ६५ हजार ग्राहकांनी २ हजार २२८ कोटी १६ लक्ष रुपये, धुळे मंडळातील १ लक्ष ४६ हजार ९३३ ग्राहकांनी ८६६ कोटी १० लक्ष रुपये तर नंदूरबार मंडळातील ८३ हजार ९३३ ग्राहकांनी ६०५ कोटी ११ लक्ष रुपये वीज देयक थकविले आहे.

 

ग्राहकांनी नियमित वीज देयक भरावे –

वीज ग्राहकांनी आपले मासिक वीज देयक नियमित भरणा केल्यास वीज पुरवठा खंडीत होण्याची नामुष्की ऒढवणार नाही. अनियमित वीज देयके भरणाऱ्या ग्राहकांची संख्या अधिक आहे. तेंव्हा महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा ग्राहक सेवेचा वेळ वसुलीच्या कामी खर्ची पडत आहे.

 
@@AUTHORINFO_V1@@