दुय्यम निंबधक कार्यालयातील लाचखोर शिपायास अटक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Mar-2018
Total Views |
 
 
दुय्यम निंबधक कार्यालयातील लाचखोर शिपायास अटक
 
 
जळगाव  १७ मार्च
येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील शिपायासह खाजगी पंटरला दोन हजाराची लाच घेतांना जळगाव लाच लुजपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी यशस्वी सापळा रचुन रंगेहाथ अटक केली.यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयात खळबळ उडाली आहे.
 
 
यावल तालुक्यातील सावखेडा सिम येथील 24 वर्षीय इसमाने अजोबच्या नावे असलेल्या मिळकतीच्या खरेदी खताच्या नोंदींच्या साक्षंकीत मिळण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात मागणी केली होती.मात्र या प्रती देण्यासाठी या कार्यालयातील शिपाई अरूण पाटील व खाजगी पंटर राजेंद्र सोनवणे यांनी 2200 रूपयाची लाच मागितली होती.
 
 
यामध्ये तडजोड होवून 2 हजार देण्याचे ठरले होते.याबाबत तक्रारदार याने जळगाव येथील लाच लुजपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार दिली होती. ठरल्याप्रमाणे आज दुपारी 2 हजार रूपयाची लाच घेतांना दुय्यम शिपाई अरूण विठ्ठल पाटील जळगाव कार्यालय,व खाजगी पंटर राजेंद्र तापिराम सोनवणे यास घेतांना रंगेहाथ पकडण्यात आले.या कार्यवाहीत जळगाव एसीबीचे उपअधीक्षक गोपाळ ठाकूर याच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक नीता कायटे व त्याचे सहकार्य होते.
@@AUTHORINFO_V1@@