रशियात पुन्हा एकदा 'पुतीन' फॅक्टर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Mar-2018
Total Views |



मॉस्को :
जगातील सर्वात मोठा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रशियाच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकांना सुरुवात झाली आहे. निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून युनायटेड रशिया पक्षाचे उमेदवार व्लादिमिर पुतीन हे तब्बल ७६ टक्के मतांनी आघाडीवर आहेत. पुतीन यांच्या पाठोपाठ रशियन कम्युनिस्ट पक्षाचे नेते पावेल ग्रुडीनी हे ११ टक्के मतांनी या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे रशियामध्ये पुन्हा एकदा 'पुतीनराज' येणार हे स्पष्ट झाले आहे.

आज सकाळपासून रशियन राजधानी मॉस्को आणि देशातील विविध भागांमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे. रशियन अध्यक्ष पदाच्या शर्यतीत एकूण ८ उमेदवार उतरले आहेत. यातील पावेल ग्रुडीनी (११.८०%) आणि व्लादिमिर झिरीनोव्स्की यांना ५.६७% मते मिळाली आहेत. या उलट उरलेले सर्व उमेदवार हे अत्यंत नाममात्र मतांसह या निवडणुकीत तग धरून आहेत.

विशेष म्हणजे पुतीन हे सलग तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी उभे राहिले असून पुन्हा एकदा जनतेनी त्यांनाच पसंती दिल्याचे पाहायला मिळत आहे. रशियाच्या सर्व प्रांतामधून सरासरी ६५ ते ८० टक्के जनतेनी राष्ट्राध्यक्ष पदासाठी पुतीन यांना पसंती दिली आहे. रशियाच्या एकूण मतदानापैकी जवळपास ७५ टक्के मतदान हे पुतीन यांच्या वाट्याला आले आहे. त्यामुळे रशियात फक्त 'पुतीन' फॅक्टरच चालतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
@@AUTHORINFO_V1@@