पालिका बेरोजगार संस्थांना किटकनाशक फवारणीचे काम देणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
 
 

मुंबई : मुंबईत वाढणारी बांधकामामुळे पाणी साचते , झोपडपट्टी परिसरात डेंग्यू, मलेरीया डास वाढतात. डासांना आळा घालण्यासाठी पालिका धूर फवारणीचे काम सहकारी व बेरोजगार संस्थांना देण्यात येणार असून यासाठी पालिका १८ कोटी रुपये खर्च करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव येत्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे. 
 
 
 
मुंबईमध्ये पावसाळा व हिवाळ्यात साथीच्या आजारांचे प्रमाण वाढते, लेप्टो, डेंग्यू, मलेरिया आदी किटकजन्य रोगांचा फैलाव होतो. हे प्रमाण रोखण्यासाठी पालिका धूर फवारणी करते, जनजागृती करते. मात्र, झाेपडपट्ट्या, सोसायट्या व सातत्यांनी वाढणारी बांधकामांमुळे यात भर भरते. त्यामुळे किटकजन्य रोगांची ठिकाणे शोधून तेथे पालिका धूर व किटकनाशक फवारणी करते. परंतु यंदा हे काम खासगी सहकारी व बरोजगार संस्थांना देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. ए ते टी विभागाकरिता हे काम दिले जाणार आहे. यासाठी अटी व शर्ती घालण्यात आल्या असून यावर १८,२२,००,५४६. कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@