डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक तीन वर्षात पूर्ण करणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
 
सी-लिंकवरून येणाऱ्या प्रत्येकाला स्मारकाचे दर्शन होणार
 
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. सरकार स्मारकाच्या बाबतीत सकारात्मक असून पुढील तीन वर्षांत स्मारकाचे बांधकाम पूर्ण होईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच मुंबईवरून सीलिंककडे येणाऱ्या आणि मुंबईला येणाऱ्या प्रत्येकाला या स्मारकाचे दर्शन होईल, अशा पद्धतीने स्मारक उभे करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
 
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे काम अद्याप सुरू झाले नसल्याने त्याच्या अंदाजित खर्चात वाढ झाल्याचे विरोधी पक्षाने आज सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. या स्मारकासाठी निश्चित करण्यात आलेल्या इंदू मिलच्या जागेचे ११ ऑक्टोबर २०१५ रोजी भूमिपूजन करून ती जागा एमएमआरडीएकडे हस्तांतरित करण्यात आली होती. मात्र त्यावेळी त्या स्मारकाचा अंदाजित खर्च सुमारे ४२५ कोटी होता. मात्र, सद्यस्थितीला हा खर्च वाढून ६२३ कोटी रुपयांवर गेल्याचे यावेळी सांगण्यात आले.
 
 
दोन वर्षात महत्त्वाचा टप्पा पूर्ण करणार
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक तीन वर्षात पूरण करण्यात येणार असून यातील महत्त्वाचे टप्पे आणि त्यांचे काम २ वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर उर्वरित टप्पा हा त्यापुढील वर्षात पूर्ण कररण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
 
 
महापुरूषांच्या स्मारकाची तुलना पैशांशी नको
 
सरदार वल्लभभाई पटेल यांचेदेखील ही स्मारक उभारण्यात येणार असून त्यांच्या स्मरकापेक्षा बाबासाहेबांच्या स्मारकावर कमी खर्च का असा सवाल प्रकाश गजभिये यांनी उपस्थित केला. यावर उत्तर देताना महापुरूषांच्या स्मारकाची तुलना पैशांशी करू नये असा सल्ला दिला. तसेच हे स्मारक सागरी किनाऱ्यावर उभे राहणार असले तरी, त्यासाठी ७ हजार कोटीदेखील लागल्यास सरकार ते उपलब्ध करून देईल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@