बोदवड शहराचा चेहरामोहरा बदलणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Mar-2018
Total Views |

विकास कामांच्या भूमिपूजनप्रसंगी खा. रक्षाताई खडसे यांचे प्रतिपादन


 
बोदवड :
बोदवड ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर होऊन एक वर्ष झाले. विकास कामांना सुरुवात झाली. शहराच्या विकासासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर असून, ३ कोटी ७६ लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन झाले आहे. त्यामुळे भविष्यात बोदवड शहराचा चेहरा-मोहरा बदलणार आहे, असे प्रतिपादन खासदार रक्षाताई खडसे यांनी केले.
 
 
बोदवड येथे रविवारी गुढीपाडव्याचे औचित्य साधून ४ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन झाले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे, नगराध्यक्षा मुमताजबी बागवान, पं.स. सभापती गणेश पाटील, नगरपंचायत गटनेता कैलास चौधरी, शिक्षण संस्था चेअरमन मिठुलाल अग्रवाल, रामदास पाटील, मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले, कैलास माळी, दिनेश माळी, हाजी सईद बागवान, अकबर बेग, सलीम कुरेशी, दीपक वाणी, किरण वंजारी, दिलीप घुले, डॉ. वैष्णव, कल्पेश शर्मा, जीवन राणे, सलाम शेख, गोपाल गंगतीरे, नरेश आहुजा, मयूर खेवलकर आदींची उपस्थिती होती.
 
 
खासदार रक्षाताई पुढे म्हणाल्या, शहरात घनकचरा व्यवस्थापन लवकरच होईल. शहरातील हायमास्ट आणि पथदिव्यांचा ठेका कंपनीला देण्यात आला असून, शहर प्रकाशमय होणार आहे. पाणीप्रश्‍न सोडवण्यासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असून, योजनेसाठी ४० ते ५० कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे. शहरातील विकास कामांसाठी ५ कोटी निधी मंजूर असून ३ कोटी ७६ लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन झाले आहे. लवकरच कामांना सुरुवात होईल, असेही त्या म्हणाल्या. दरम्यान, शहरात विकास कामांचे भूमिपूजन झाल्याने शहरवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@