तेलगु देसम पक्ष आज सादर करणार अविश्वास प्रस्ताव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Mar-2018
Total Views |
 
 
 
नवी दिल्ली : तेलगु देसम पक्षाचा बहुचर्चित अविश्वास प्रस्ताव आज सादर करण्यात येणार आहे. तेलुगु देसम पक्ष (टीडीपी) आणि वायएसआर काँग्रेस लोकसभेत आज केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर करणार आहेत. वायएसआर काँग्रेसतर्फए वाय. व्ही. सुब्बारेड्डी यांनी अविश्वास प्रस्ताव आज सादर करण्यात यावा यासाठी सचिवांना अर्ज केला होता, तसेच टीडीपीनेही अविश्वास प्रस्तावासाठी अर्ज पाठवला आहे, त्यामुळे हा अविश्वास आस सादर करण्यात येणार आहे.
 
शुक्रवारी या दोन्ही पक्षांनी आणलेला अविश्वास प्रस्ताव सादर होऊ शकला नव्हता. विविध विषयांवर विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे शुक्रवारी हा प्रस्ताव सादर करता आला नाही, त्यामुळे त्याचा समावेश सोमवारच्या कारवाईत व्हावा अशी मागणी दोन्ही पक्षांनी केली आहे.
 
टीडीपी आणि वायएसआर काँग्रेस आता दुसऱ्या विरोधी पक्षांकडे अविश्वास प्रस्तावासाठी पाठिंबा मागत आहेत. अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यासाठी किमान ५० खासदारांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे. काँग्रेस, डीएमके, सपाशिवाय डाव्या पक्षांनी अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. मात्र केंद्र सरकारला अविश्वास प्रस्ताव नामंजूर होण्याचा पूर्ण विश्वास आहे.
 
लोकसभेत सध्या ५३९ सदस्य आहेत. बहुमत सिद्ध करण्यासाठी २७० खासदारांची आवश्यकता आहे. भाजपकडेच २७४ खासदार आहेत. तसेच भाजपाला इतर काही पक्षांचेही समर्थन आहे. टीडीपीच्या १६ खासदारांनी राजीनामा दिल्यामुळे एनडीएचे संख्याबळ कमी झाले आहे.
@@AUTHORINFO_V1@@