पालिका शाळेतील वॉटर प्युरीफायर दुरुस्तीसाठीच्या निधीमध्ये घोटाळा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
 
विनोद मिश्रा यांची चौकशीची मागणी
 
 

मुंबई :  मुंबई महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे यासाठी वॉटर प्युरीफायर बसविण्यात आल्या; परंतु या वॉटर प्युरीफायरची देखभाल केली जात नाही,देखभाल दुरुस्तीसाठीच्या निधीमध्येही घोटाळा झाला असून त्याची चौकशी करावी व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीभाजपाचे नगरसेवक विनोद मिश्रा यांनी पालिका सभागृहात अर्थसंकल्पावरील भाषणात केली.
 
 
तर कांदिवली येथील डॉ. बाबसाहेब आंबेडकर रुग्णालयात रुग्णांना पुअर बॉक्स फंडातून देण्यात येणाऱ्या औषधात भ्रष्टचार सुरू आहे. रुग्णांना तेथील डॉक्टरच्या पत्नीच्या मेडिकल शॉपमधूनच औषधे खरेदी करण्यास सांगण्यात येत असल्याची तक्रार विनोद मिश्रा यांनी यावेळी केली. येथे ज्या डॉक्टरांचे घर दूर अंतरावर आहे व ज्यांना तातडीने घरांची आवश्यकता आहे, त्यांना स्टाफ क्वाटर्सची आवश्यकता आहे त्यांना त्या न देता ज्यांची घरे जवळच आहेत अशा डॉक्टरांना ही घरे दिली जातात, अशी तक्रार त्यांनी यावेळी केली.
 
 
त्यासोबत मुंबईत कोणताही रस्ता कोट्यवधी रुपये खर्चून कितीही चांगला बनवला तरी उपयोगिता सेवांसाठी रस्ते वारंवार खोदावे लागतात. त्यामुळे चांगल्या रस्त्याची दुरवस्था होते. असाच प्रकार नव्याने उभारण्यात येणाऱ्या कोस्टल रोडबाबत होऊ नये. उपयोगिता सेवांसाठी पालिकेने दक्षता बाळगून खास वेगळी व्यवस्था करावी, अशी मागणी विनोद मिश्रा यांनी केली आहे.  
 
@@AUTHORINFO_V1@@