गाळ्यांचा लिलाव होऊ देणार नाही!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Mar-2018
Total Views |

मनपा मार्केटमधील गाळेधारकांची आक्रमक भूमिका

 
जळगाव :
महापालिकेच्या १८ मार्केटमधील भाडेकराराची मुदत संपलेल्या गाळ्यांचा प्रशासन लिलाव करू पाहत आहे. मात्र, यात गाळेधारकांवर मोठा अन्याय होत असल्याने गाळ्यांचा लिलाव होऊ देणार नसल्याचे गाळेधारकांतर्फे आयोजित पत्रपरिषदेत सांगण्यात आले.
 
 
हिरानंद मंधवाणी यांनी गाळ्यांचा तिढा सोडविण्यासाठी आजपर्यंत झालेल्या प्रयत्नांची माहिती दिली. नगरपालिकेने ३१ मार्च २०१२ नंतर भाड्याची रक्कम स्वीकारणे अचानकपणे थांबविले. मागणी केली नसल्याचे कारण त्यासाठी देण्यात आले. परंतु प्रशासनाने २०१५ मध्ये अचानक तीन वर्षांच्या भाड्याची मागणी गाळेधारकांकडे केली. गाळेधारकांना थकबाकीदार ठरविण्याचा हे षड्यंत्र होते. गाळेधारकांची ‘हरकत कायम ठेवून’ त्यांच्या गाळ्यांचे भाडे स्वीकारावे ही आमची मनपाकडे मागणी होती. करार संपल्यानंतर त्याचे ३ वर्षांसाठी नूतनीकरण करायला हवे होते. या सर्व प्रकरणात जळगाव शहराला ‘वेठीस कुणी धरलं, अडचणीत कुणी आणलं?’ असा थेट प्रश्‍नही उपस्थित केला. गाळेधारक आजही भाडे भरायला तयार आहे. ते अनधिकृत भोगवटादार नाहीत. २०१२ नुसार प्रचलित भाडेआकारणी करावी ही प्रमुख मागणी असल्याचे हिरानंद मंधवाणी यांनी सांगितले.
 
 
तत्पूर्वी सकाळी गाळेधारकांची बैठक झाली. यात हिरानंद मंधवाणी, प्रेमचंद समदानी, रमेश मतानी, राजकुमार अडवाणी, तेजस देपुरा, संजय पाटील, युवराज वाघ, प्रदीप जैन यांच्यासह अधिक गाळेधारक उपस्थित होते. बैठकीत २० मार्चपासून पुकारण्यात येणार्‍या बंदबाबत चर्चा करण्यात आली. सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणार्‍या महामोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
 
 

मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी स्वतंत्र विमान करू - जळगाव शहर मनपा मार्केट गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे म्हणाले की, मुख्यमंत्री लिलावाची प्रक्रिया थांबवू शकतात. कॅम्पाकोलासाठी कायद्यात बदल केला जातो, तर जळगावसाठी का होत नाही? जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदारांनी एकत्र येवून मुख्यमंत्र्यांची भेट घेवून गाळेधारकांची बाजू मांडली पाहिले. मुख्यमंत्र्याची भेट घेण्यासाठी जळगावहून मुंबईला जाण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करू, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, गाळेधाकांच्या मागण्यांबाबत जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी माहिती घेऊन बोलतो, असे सांगितले.

 
@@AUTHORINFO_V1@@