मू. जे. महाविद्यालयाचा रुपेश बिर्‍हाडे राज्यात प्रथम पुरस्काराने सन्मानित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Mar-2018
Total Views |

जळगाव  :
भारत लोकप्रशासन संस्था, महाराष्ट्र प्रादेशिक शाखा मंत्रालय (मुंबई) आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत जळगावच्या मू. जे. महाविद्यालयाचा विद्यार्थी रुपेश बिर्‍हाडे याने प्रथम क्रमांक पटकाविला. जलयुक्त शिवार अभियान (महाराष्ट्र राज्य) हा निबंधाचा विषय होता.
 
 
राज्याचे मुख्य सेवा हक्क आयुक्त स्वाधिन क्षत्रीय आणि महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण सदस्य तथा राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. विजय सतबीर सिंग यांच्याहस्ते पारितोषिक देऊन रुपेश बिर्‍हाडे याला गौरविण्यात आले.
 
 
या स्पर्धेतील विजेत्यांमध्ये द्वितीय : रवींद्र पंडित (अहमदनगर), तृतीय : सुरभी भाटिया (मुंबई), उत्तेजनार्थ : विजय गायकवाड (पुणे) यांचा समावेश आहे. स्पर्धेसाठी ३२४ निबंध आले होते. प्रथम क्रमांक प्राप्त रुपेश बिर्‍हाडे हा मू. जे. महाविद्यालयातील एम. ए. द्वितीय वर्ष राज्यशास्त्र शाखेचा विद्यार्थी आहे. त्याचे या यशाबद्दल जलसंपदामंत्री गिरीश महाजन, डॉ. निशिकांत देशपांडे, आरोग्यदूत रामेश्वर नाईक, मू. जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी, उपप्राचार्य प्रा. डॉ. सुरेश तायडे, प्रा. डॉ. शिरीष पाटील, प्रा. डॉ.अंशुमन मिश्रा, प्रा. डॉ. विद्या पाटील, प्रा.विजय लोहार, प्रा. अनिल क्षीरसागर, प्रा. एस. बी. हिंगोणेकर, प्रा. राजीव पवार, प्रा. हर्षल पाटील, प्रा. जयेश पाडवी यांनी अभिनंदन केले.
@@AUTHORINFO_V1@@