राज्यात लवकरच हुक्का पार्लरवर बंदी येणार ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
कायद्याचे प्रारूप तयार; मुख्यमंत्र्यांची माहिती
 
मुंबई  : राज्यात लवकरच हुक्का पार्लरवर बंदी येण्याची शक्यता आहे. यावर बंदी किंवा निर्बंध घालण्यात येणार असल्याचे संकेत नुकतेच मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी दिले. यासाठी कायदा करण्यात येणार असून त्याचे प्रारूप तयार करण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 
 
 
काही महिन्यांपूर्वी कमला मिल परिसरातील एका हुक्का पार्लरमध्ये लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला होता, तर ५६ जण जखमी झाले होते. यानंतर संपूर्ण राज्यात हुक्का पार्लरवर बंदी घालण्याची मागणी सर्व स्तरातून करण्यात आली होती. यानंतर आलेल्या अहवालात सदर आग ही हुक्का पार्लर मधील ठिगणीमुळे लागल्याचे नमूद करण्यात आले होते. हिवाळी अधिवेशनादरम्यान आ. मंगलप्रभात लोढा यांनीदखील हा मुद्दा उपस्थित करत हुक्का पार्लरवर बंदी करण्याची मागणी केली होती. दरम्यान, हुक्का पार्लरच्या माध्यमातून अनेक नशेचे पदार्थ विद्यार्थी वर्गापर्यंत पोहोचत असल्याचे निदर्शनास आले असून ही गंभीर बाब आहे.
 
 
 
 
तसेच हुक्का पार्लवरील निर्बंधांकरिता कायद्याचे प्रारूप तयार करण्यात आले असून तो लवकरच मांडण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. यापूर्वी याबाबत राज्यात हुक्का पार्लरसाठी कोणताही कायदा नव्हता, मात्र आता तो तयार करण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या घटनेनंतर तात्काळ चौकशीचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर ६ अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करण्यात आले असून फायर आॅडिटींगदेखील सुरू केल्याचे ते म्हणाले. तसेच न्यायालयाच्या निर्देशानुसार समितीची स्थापना करण्यात येणार असून यात केवळ न्यायाधिशच नाही तर १ निवृत्त न्यायाधिश, १ नगररचनाकार, १ अर्बन डेव्हलपमेंट मधील माजी सचिव यांचा समावेश असणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
 
 
केवळ नफा कमवण्यासाठी नियमांना बगल

आग लागलेल्या हुक्का पार्लरपैकी एका हुक्का पार्लरमध्ये फायर एक्सिट होते. मात्र, केवळ नफा कमावण्यासाठी त्या मार्गामध्ये टेबल ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. आग लागली त्यावेळी अनेकांनी सुरक्षित जागा म्हणून बाथरूमच्या दिशेने धाव घेतली. परंतु त्यांचा त्याठिकाणी गुदमरून मृत्यू झाल्याचे निदर्शनास आल्याचे ते म्हणाले. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@