एक वर्षात उत्तर प्रदेश खड्डेमुक्त : योगी आदित्यनाथ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Mar-2018
Total Views |

 
 
लखनऊ : गेल्या एक वर्षात उत्तर प्रदेशात १ लाख १ हजार किलोमीटर रस्त्यांचा निर्माण करण्यात आला आहे. केवळ ९ महिन्यातच उत्तरप्रदेशला खड्डेमुक्त करण्यात आले आहे, असा दावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला. आज योगी आदित्यनाथ सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानिमित्ताने 'एक साल नई मिसाल' हा कार्यक्रम लोकभवन येथे आयोजित करण्यात आला आहे, त्यानिमित्ताने योगी आदित्यनाथ बोलत होते.
 
 
 
 
 
कार्यक्रमाची सुरुवात मयूर नृत्य, आल्हा, फरूवाही, राई, रागिनी, अशा पारंपारिक लोकनृत्य तसेच कथक नृत्याने करण्यात आली. तसेच यावेळी योगी आदित्यनाथ यांनी गेल्या एक वर्षात राज्यात सामान्य माणसांसाठी लागू करण्यात आलेल्या योजनांविषयी माहिती दिली. तसेच शेकतऱ्यांसाठी सरकारने केलेल्या कार्याची माहिती दिली.
 
 
 
 
 
यावेळी योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते 'एक साल नई मिसाल' या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. नुकतेच उत्तर प्रदेश येथे योगी आदित्यनाथ यांच्या मतदार संघात गोरखपुर येथे झालेल्या पोटनिवडणूकीत भाजपला अपयश पत्करावे लागले, त्यामुळे आजच्या या कार्यक्रमावर समाज माध्यमांतून टीका देखील होत आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@