ग्राहकांचे हक्क, कर्तव्यांविषयी प्रबोधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Mar-2018
Total Views |

ग्राहक सेवा संघ पाचोरा-भडगाव संस्थेतर्फे ग्राहक दिन साजरा


पाचोरा :
ग्राहकांसाठी कार्य करणार्‍या ग्राहक सेवा संघ पाचोरा-भडगाव या सेवाभावी संस्थेतर्फे जागतिक ग्राहक हक्क दिवस’ साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम सु.भा. पाटील विद्या मंदिरात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्षमा शर्मा होत्या.
उज्ज्वला देशमुख यांनी ग्राहक हक्क दिनाचे महत्त्व सांगितले. अजिंक्य वाघ यांनी ग्राहक सेवा संघाच्या कार्याविषयी माहिती दिली. डॉ. संजय माळी यांनी निरनिराळ्या वस्तू व पदार्थांमध्ये होणारी भेसळ कशी ओळखावी? याबाबत माहिती सांगितली.
 
 
दिलीप शिरुडे यांनी शेतकर्‍यांची होणारी फसवणूक, शेतकर्‍यांनी घ्यावयाची खबरदारी याची माहिती दिली. डॉ. विलास देशमुख यांनी ग्राहक संरक्षण कायदा १९८६ ग्राहकांचे हक्क आणि कर्तव्य याबाबत प्रबोधन केले. प्राचार्य डी.एफ. पाटील यांनी वस्तू व सेवा विकत घेणारा तो ग्राहक, ग्राहकाने वस्तू विकत घेताना पावती घेणे आवश्यक आहे, असे सांगितले. क्षमा शर्मा यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ग्राहक संरक्षण कायदा ग्राहक हिताचा कायदा आहे, असे सांगितले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन आनंद नवगिरे यांनी केले.
 
 
यांची होती उपस्थिती
विनोदराय मोदी, दत्तात्रय, बोरसे, सतपाल परदेशी, उपप्राचार्य एन.के. कुलकर्णी, राजेश घनराळे, गोपाळ पटवारी, राजेंद्र प्रजापत, अब्बास कपाशी, राधा शर्मा, उज्ज्वला महाजन, कविता महाजन, शिला पाटील, माया सूर्यवंशी, संगीता नेवे, नीना राजपूत, सुमंगला तांबोळी, माला पंजाबी, मंजुषा जोशी, रचना पंजाबी, कविता महाजन, आशा सोनार, मंगला देवरे, दुर्गा मोरे, कामिनी पाठक, वर्षा राजपूत, वंदना पाटील, पूजा अहिरे, पौर्णिमा शर्मा, रत्ना राजगोंड, खलील शेख, मोहन तळणीकर, सरफराज मिर्झा, राधेशाम दायमा, शांताराम मोरे, प्रकाश देशमुख, डॉ.राजेंद्र परदेशी, लिलाराम थदाणी, रवींद्र सोनवणे, बी.पी. वाणी, अमोल भावसार, राजू साथी, पंकज चौधरी उपस्थित होते.
 
@@AUTHORINFO_V1@@