2 हजारांची लाच घेतांना ग्रामसेवक रंगेहात जाळयात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Mar-2018
Total Views |
 
2 हजारांची लाच घेतांना ग्रामसेवक रंगेहात जाळयात
 
जळगाव, 19 मार्च
रोजगार हमी योजना अंतर्गत सिंचन विहीर मंजुर झालेल्या अनुदानाचा चेक देणेसाठी ग्रामसेवकाने 2 हजार 500 रुपये लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली होती. 2 हजाराची लाच 19 रोजी स्विकारतांना त्यास रंगेहात ताब्यात घेण्यात आले.
 
 
तक्रारदार हे 65 वर्षीय पुरूष असून खुर्दे बु. ता.धरणगाव येथील रहिवासी आहेत. तक्रारदाराने त्यांना रोजगार हमी योजना अंतर्गत सिंचन विहीर मंजुर झालेल्या अनुदानाचा कुशलचा धनादेश देण्यासाठी आरोपी ग्रामसेवक सतीश सी.पाटील वय 35 ग्रामपंचायत खुर्दे ता.धरणगाव याने तक्रारदाराकडे 19 रोजी 2 हजार 500 रुपये लाचेची मागणी केली होती.याबाबत तक्रारदाराने अॅन्टी करप्शन ब्युरो जळगावकडे तक्रार केली. त्यावरून 2 हजार रुपयांची लाच स्विकारतांना 19 रोजी ग्रामसेवक सतीश पाटील रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई पोलीस उपअधिक्षक जी.एम.ठाकुर यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
 
@@AUTHORINFO_V1@@