भारतीय संघाने उभारली विजयाची गुढी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Mar-2018
Total Views |

निदास चषकाच्या अंतिम सामन्यात बांगलादेशावर रोमहर्षक विजय  




कोलंबो : निदाहास टी-२० चषकाच्या अंतिम सामन्यात भारताने बांग्लादेशवर रोमहर्षक विजय मिळवत ऐनगुढीपाडव्यालाच विजयी गुढी उभारली आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात बांगलादेश संघाने दिलेले १६७ धावांचे आव्हान भारतीय संघाने चार गडी राखून पार केले. दिनेश कार्तिक हा भारताच्या या विजयाचा शिल्पकार ठरला असून या सामन्याचा सामनावीर होण्याचा मान देखील त्यांनी पटकावला आहे. तसेच वॉशिंग्टन सुंदर याने मालिकावीर होण्याचा बहुमान मिळवला आहे.
बांग्लादेश संघाने प्रथम फलंदाजी करत असताना भारतापुढे विजयासाठी १६७ धावांचे आव्हान ठेवले होते. यानंतर मैदानात आलेल्या भारतीय संघाने नेहमीप्रमाणेच आपल्या आक्रमक पद्धतीने खेळला सुरुवात केली होती. कर्णधार रोहित शर्मा याने ५६ धावांची अर्धशतकी खेळी करत भारताचा पाया रचून दिला. यानंतर शिखर धवन (१०), लोकेश राहुल (२४), मनीष पांड्ये (२८), विजय शंकर (१७) आणि दिनेश कार्तिक ( नाबाद २९) यांच्या खेळीच्या बळावर भारताने विजयाची गुढी उभारली. अगदी शेवटच्या चेंडूवर दिनेश कार्तिक षटकार मारत भारताला विजय मिळवून दिला. त्यामुळे हा सामना सर्व चाहत्यांसाठी अत्यंत रोमहर्षक ठरला.



कोलंबोतील आर. प्रेमदास मैदानावर हा सामना रंगला होता. सामन्याच्या सुरुवातीला भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मैदानात आलेल्या बांगलादेश संघाने देखील आक्रमकपणे आपल्या खेळला सुरुवात केली होती. परंतु भारताच्या युझवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी बांगलादेशच्या खेळा खोडा घालत पहिल्या दहा षटकांमध्येच त्यांचे ४ बळी घेतले. अशा स्थितीत देखील शब्बीर रहमान याने ७७ धावांची खेळी करत बांगलादेशचा डाव मजबूत करून दिला. यानंतर महमुदुल्ला (२१), मेहदी हसन (नाबाद १९), तमिम इक्बाल (१५), लितोस दास (९) यांच्या लहान मोठ्या खेळींच्या बळावर बांगलादेशाने ८ बाद १६६ धावांची समाधानकारक मजल मारली होती.


भारताचा डाव :
 



बांगलादेशाचा डाव : 
 
 
@@AUTHORINFO_V1@@