श्रीरामांच्या अस्तित्वावर प्रश्न करणारेच स्वतःला पांडव म्हणत आहेत : सीतारामन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Mar-2018
Total Views |

 देशविरोधी कृत्य करणे हेच कॉंग्रेसचे मुख्य धोरण 


नवी दिल्ली : कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजप आणि संघावर केलेल्या टीकेनंतर भारतीय जनता पक्षाने कॉंग्रेस खरपूस समाचार घेतला आहे. 'एकेकाळी श्रीरामांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे लोकच आज स्वतःला पांडव म्हणवून घेत आहेत, ही अत्यंत आश्चर्याची बाब आहे', अशी टीका संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. नवी दिल्ली येथे भाजप कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या आज बोलत होत्या.

कॉंग्रेसने हिंदू समाजाच्या भावनांचा कधीही विचार केला नाही, श्रीरामांच्या अस्तित्वावर आजपर्यंत नेहमी प्रश्नचिन्ह निर्माण केले. परंतु निवडणुका जवळ आल्यानंतर मात्र राहुल गांधी यांनी मंदिर भेटी सुरु केल्या. स्वतःला हिंदू म्हणवून घेण्यास सुरुवात केली आणि आज कॉंग्रेस पक्ष हा पांडवांच्या भूमिकेत असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे हे सर्व फक्त हिंदू मतांसाठी केले जात असून जनतेला पुन्हा एकदा फसवण्याचे काम कॉंग्रेस करत आहे, असे त्यांनी म्हटले. तसेच जनतेला देखील 'सत्य काय आणि असत्य काय' हे आता समजू लागले आहे, त्यामुळे काँग्रेसच्या या अशा प्रकारच्या वक्तव्यांचा जनताच समाचार घेईल, असे त्या म्हणाल्या.

देशविरोधी कृत्य करणे हेच कॉंग्रेसचे मुख्य धोरण
कॉंग्रेसने स्वातंत्र्यनंतरच्या आपल्या आजपर्यंतच्या कार्यकाळामध्ये देशात भ्रष्टाचाराचे नवनवे विक्रम प्रस्थापित केले, देशाच्या लोकशाहीवर थेट हल्ला चढवत देशात आणीबाणी लागू केली, शिखांविरोधात दंगली पेटवल्या, 'देशाचे तुकडे व्हावेत' अशा घोषणा देणाऱ्या लोकांना पाठीशी घातले अशा एकदोन नव्हे तर देशविघातककृत्यांची मालिकाच तयार केली. असे असताना देखील कॉंग्रेस कोणत्याही तोंडानी भारतीय जनता पक्षावर आरोप लावत आहे, असा खडा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच सावरकरांवर भाष्य करण्याअगोदर राहुल यांनी स्वतःच्या चारित्र्याकडे अगोदर एकवेळ पाहावे, असा सल्ला देखील त्यांनी दिला.


नॅशनल हेराल्ड प्रकरणी का बोलत नाहीत ?

याच बरोबर भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून देखील सीतारामन यांनी कॉंग्रेसची चांगलीच कानउघडणी केली. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. परंतु नॅशनल हेराल्ड प्रकरणी मात्र ते गप्प का बसले आहेत ?, असा प्रश्न त्यांनी विचारला. राहुल गांधी हे स्वतः या प्रकरणात जामिनावर बाहेर आहेत आणि भाजप नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे, ते निवळ हास्यास्पद आहे, असे देखील त्या म्हणाल्या.

निर्मला सीतारामन यांची संपूर्ण पत्रकार परिषद : 
 
 
@@AUTHORINFO_V1@@