मनपा प्रशासनाकडून गाळेधारकंना वेठीस धरण्याचे काम - डॉ. शांताराम सोनवणे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Mar-2018
Total Views |
 
मनपा प्रशासनाकडून गाळेधारकंना वेठीस धरण्याचे काम -  डॉ. शांताराम सोनवणे 
 
 
जळगाव-मनपावर असलेले हुडकोचे जे कर्ज फेडण्याची गरज आहे, मात्र ते कर्ज फेडण्यासाठी मनपा प्रशासनाला शहरातील इतर स्त्रोत का दिसत नाही ?, केवळ ठराविक बिल्डर लॉबीचा फायदा व्हावा यासाठीच मनपा प्रशासनाकडून गाळेधारकंना वेठीस धरण्याचे काम सुरु असून, गाळे लिलाव करुन त्या ठिकाणी धनाढ्य लोकांची दुकाने तयार करण्याचे स्वप्न मनपाचे आहे. मात्र, शहरातील गाळेधारक त्यांचे स्वप्न पूर्ण होवू देणार नाहीत. त्यासाठी सर्व गाळेधारकांनी एकत्रित येवून बेमुदत बंदमध्ये सामील होण्याचे आवाहन मनपा गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ.शांताराम सोनवणे यांनी केले. 

रविवारी शहरातील संत हरदासराम मंगलकार्यालयात १८ मार्केटमधील गाळेधाकरांची बैठक घेण्यात आली. बैठकीत हिरानंद मंधवाणी, प्रेमचंद समदानी, रमेश मतानी, राजु अडवाणी, तेजस देपुरा, संजय पाटील, युवराज वाघ, प्रदिप जैन, नगरसेवक अजय पाटील यांच्यासह ३०० हुन अधिक गाळेधारक उपस्थित होते. बैठकीत २० मार्चपासून पुकारण्यात येणार बंदबाबत चर्चा करण्यात आली. तसेच सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणाºया महामोर्च्यात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. 
मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी विमानाची व्यवस्था करु 
डॉ.सोनवणे म्हणाले की,गाळेधारकांना लाखो रुपयांचे प्रिमीयम व चुकीचे बिले दिली जात आहेत. मनपानेच गाळेधारकांना प्रस्थापित केले व आता विस्थापित करण्याचे काम सुरु आहे. मात्र, गाळेधारकांच्या हातातुन कोणतीही परिस्थिती गेली नाही. मुख्यमंत्र्यांनी विशेषाधिकाराचा वापर केल्यास लिलावाची प्रक्रिया थांबू शकते. यासाठी जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदारांनी एकत्र येवून मुख्यमंत्र्यांची भेट घेवून गाळेधारकांची बाजु मांडली पाहिले. मुख्यमंत्र्याची भेट घेण्यासाठी जळगावहून मुंबईला जाण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करु अशी माहिती डॉ.सोनवणे यांनी दिली. 
मुदतवाढ देण्याची गरज
२०१२ मध्ये मुदत संपल्यानंतर गाळे लिलावाचाच सध्या विचार केला जात आहे. माणुसकीच्या दृष्टीने देखील गाळेधारकांची बाजु समजुन घेण्यासाठी कोणीही दिसून येत नाही. गाळेधारक सर्व बिले, नियमानुसार भरायला तयार आहे. मात्र, गाळ्यांची मुदत आणखीन काही वर्ष वाढविता येणार होती. ती वाढण्यात आलेली नाही. २००४ मध्ये मुदत संपलेल्या गाळ्यांची मुदत ९ वर्षांसाठी वाढू शकते तर २०१२ मध्ये मुदत संपलेल्या गाळ्यांची मुदत वाढ का वाढवली नाही असा प्रश्न हिरानंद मंधवाणी यांनी उपस्थित केला.
 
@@AUTHORINFO_V1@@