२०१९ मध्ये भाजपचा पराभव निश्चित : राहुल गांधी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Mar-2018
Total Views |


नवी दिल्ली : येत्या २०१९ च्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेस पक्ष हा बहुमताने विजयी होणार असून भाजपचा पराभव आता निश्चित झाला आहे, असे प्रतिपादन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केले आहे. नवी दिल्ली येथे आयोजित कॉंग्रेसच्या ८४ व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.

गेल्या तीन वर्षांमध्ये मोदी सरकारने देशाला पूर्णपणे खड्डात घातले आहे. मोदींच्या काळात देशात भ्रष्टाचार वाढला असून संपूर्ण देशावर भाजपने आपला दबाव निर्माण केला आहे. परंतु जनतेला देखिल आता हे सर्व समजले आहे. त्यामुळे भाजप एकापाठोपाठ एक निवडणूक हरत आहे, त्यामुळे येत्या २०१९ च्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेस पक्ष बहुमताने सत्तेवर येणार असून कॉंग्रेसचे जुने पुन्हा एकदा अस्तित्वात येणार आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

भाजप आणि संघ हे 'कौरवप्रमाणेच'
आपल्या संपूर्ण भाषणामध्ये राहुल यांनी भारतीय जनता पक्ष आणि रा.स्व.संघावर जोरदार टीका केली. भाजप आणि संघ हे कौरवांप्रमाणे सध्या सत्तेसाठी लढत आहेत, अशी टीका राहुल यांनी यावेळी केली. तसेच कॉंग्रेस पक्ष पांडवांप्रमाणे असून तो देशातील सामन्य जनतेसाठी आणि सत्यासाठी लढत आहे, असे ते म्हणाले. याच बरोबर संघाला देशातील सर्व घटकांवर आपला ताबा मिळवायचा आहे, जेणेकरून सर्व देश त्यांच्या इशाऱ्यावर चालेल, परंतु कॉंग्रेस आणि देशातील सामान्य जनता असे काही देखील होऊ देणार नाही, असे ते म्हणाले.



दहा वर्षात देशाचे चित्र बदलू
आपल्या या भाषणामध्ये राहुल यांनी जनतेला अनेक नवी आश्वासने देखील दिली. कॉंग्रेस पक्ष हा एक व्यापक विचारधारा असून तिच्यामध्ये जुन्या नव्या अशा सर्वांना जगा आहे, असे ते म्हणाले, देशातील तरुणांना एकत्र घेऊन यापुढे कॉंग्रेस आपले वाटचाल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच देशातील शेतकऱ्याच्या विकासासाठी, पत्रकारांच्या रक्षणासाठी अन तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कॉंग्रेस देशाला योग्य दिशा देईल, असे त्यांनी म्हटले. कॉंग्रेस पक्षाकडे विकासाच्या दृष्टीने अनेक कल्पना असून येत्या १० वर्षांमध्ये संपूर्ण देशाचे चित्र बदलून टाकू, असे आश्वासन त्यांनी दिले.

राहुल गांधी यांची संपूर्ण पत्रकार परिषद : 
 
 
@@AUTHORINFO_V1@@