राज ठाकरेंची शिवतीर्थावर जाहीर सभा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Mar-2018
Total Views |

 
 
मुंबई :  नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची शिवतीर्थावर जाहीर सभा आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी ते कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. संध्याकाळी ५ वाजता या सभेला सुरुवात होणार असून राज्यभरातून अनेक कार्यकर्ते या सभेत सहभागी होणार आहेत.
 
 
 
 
 
मनसेच्या १२ व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी या जाहीर सभेची घोषणा केली होती. त्यानंतर अखेर आज ही सभा आयोजित करण्यात येणार आहे.
 
राज ठाकरे जाहीर सभांमधून नेहमीच आपल्या खास शैलीत राजकीय मते मांडतात. यामध्ये सत्ताधारी पक्षावर आणि अनेक नेत्यांवर करण्यात येणाऱ्या टीकेचाही समावेश आहे. नुकतीच राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट झाली, त्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले होते, मात्र आता आजच्या सभेतून ते काय बोलणार, आणि राज ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीचे आणखी काही अर्थ निघतायेत का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
@@AUTHORINFO_V1@@