देश मोदीमुक्त करण्याची गरज : राज ठाकरे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Mar-2018
Total Views |

देशामध्ये सध्या हिटलरशाही सुरु; मोदी-शाह यांच्यावर जोरदार टीका






मुंबई : 'भारतामध्ये सध्या हिटलरशाही सुरु असून देशात अत्यंत घाणेरडे राजकारण केले जात आहे. त्यामुळे २०१९ मध्ये देश हा 'मोदीमुक्त' करणे गरजेचे आहे' असे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. मुंबईतील शिवाजी पार्क येथे आयोजित आजच्या सभेमध्ये ते बोलत होते.

'भाजप सरकार हे सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. केंद्र सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु आहे. परंतु सरकारविरोधात कसल्याही प्रकारची बातमी बाहेर येऊ नये, म्हणून केंद्र सरकार आणि भाजपकडून माध्यमांवर दबाब आणला जात आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह पूर्णपणे हिटलरची नीती वापरत आहेत. त्यामुळे आता त्यांना संपवणे गरजेचे आहे, असे ते यावेळी म्हणाले.


खोटी आश्वासने आणि जनतेची फसवणूक
नरेंद्र मोदी यांनी निवडणुकी अगोदर जनतेला खूप खूप मोठी आश्वासने दिली होती. परंतु त्यातील एकही आश्वासन त्यांनी पाळलेले नाही. जनतेला फुगवून आकडे सांगणे आणि त्यांच्या मार्फत जनतेची दिशाभूल करणे हेच तंत्र सध्या पाळले जात आहे.


मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव

मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी सरदार वल्लभभाई यांनी नेहरूवर सातत्याने दबाव टाकला जात होता. परंतु संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याने मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली. पण आता मोदी पुन्हा एकदा तोच डाव खेळत असून मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे मराठी माणसाने जागृत राहून मोदींचा हा डाव उधळून लावला पाहिजे, असे ते म्हणाले.


येत्या काही वर्षात देशात धार्मिक दंगली

भाजप स्वतःच्या स्वार्थासाठी अत्यंत नीच प्रकारचे राजकारण करत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये देशात राम मंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला जाईल व या मुद्द्यावरून देशात धार्मिक दंगली पेटण्याची शक्यता आहे, असे भाकीत देखील त्यांनी यावेळी केले.
सर्व विरोधकांनी एकत्र येण्याची गरज

सभेच्या शेवटी ठाकरे यांनी 'मोदीमुक्त भारत' करण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन केले. भारताला या अगोदर १९४७ आणि १९७७ मध्ये स्वातंत्र्य मिळालेले आहे. परंतु आता २०१९ मध्ये देखील भारताला स्वतंत्र्याची गरज आहे, म्हणून सर्व विरोधकांनी येत्या निवडणुकांमध्ये एकत्र यावे, असे ते म्हणाले.


@@AUTHORINFO_V1@@