जम्मू काश्मीर : पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्र संधीचे उल्लंघन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Mar-2018
Total Views |

 
 
पूँछ : जम्मू काश्मीरच्या पूँछ येथे पुन्हा एकदा पाकिस्तानने शस्त्र संधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानी सैन्याने भारतीय सानिकांवर अचानक गोळीबार सुरु केला. या हल्ल्यात एकाच परिवारातील ५ लोकांचा मृत्यु झाला असून दोन नागरिक जखमी झाले आहेत. जखमी नागरिकांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
पाकिस्तान कडून अचानक सुरु झालेल्या गोळीबाराला भारतीय सैन्याने देखील चोख प्रत्युत्तर दिले. पूँछच्या बालाकोट सेक्टर मध्ये ही घटना घडली. सकाळी सुमारे ७.४५ ला पाकिस्तानी सैन्याने गोळीबार सुरु केला. पाकिस्तानी सैन्य मुद्दाम नागरी भागांना लक्ष्य करत आहे, ज्यामुळे नागरिकांच्या जीवाला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण करण्याचा प्रयत्न पाकिस्तान तर्फे सुरु आहे.
 
गेल्या वर्षभरात पाकिस्तानने असंख्य वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला आहे. यामध्ये भारताच्या अनेक जवानांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मात्र दरवेळी भारतीय जवानांनी पाकच्या नापाक कारवायांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
@@AUTHORINFO_V1@@