मोदींमुळे शेजारील राष्ट्रांशी संबंध बिघडले : कॉंग्रेस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Mar-2018
Total Views |



नवी दिल्ली : भाजप सरकारने गेल्या चार वर्षांमध्ये परराष्ट्र नीतीमध्ये अनेक बदल केले आहेत. या बदलांमुळेच आज भारताचे शेजारी राष्ट्रांबरोबर असलेले संबंध कमालीचे बिघडले आहेत, असा नवा युक्ती कॉंग्रेस पक्षाकडून आज करण्यात आला आहे. नवी दिल्ली येथे आयोजित कॉंग्रेस दोन दिवशी महाअधिवेशानामध्ये कॉंग्रेस नेत्यांनी हा तर्क लावला आहे.

मोदींनी परराष्ट्र नीतीत देशाचा कसलाही विचार न करता फक्त आपला अजेंडा पुढे ठेवून अनेक मोठे बदल केले आहेत. या बदलांमुळे आज भारताचे आपल्या शेजारी राष्ट्रांशी असलेले संबंध कमालीचे बिघडले आहेत. तसेच जगातील अनेक देश देखील आज भारतावर नाराज झाले आहेत, असा तर्क कॉंग्रेस नेते आनंद शर्मा यांनी केला. तसेच भाजप सरकार आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील फोल ठरल्याचे सांगत मोदींवर टीका केली.

यानंतर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देखील भाजप सरकारची परराष्ट्र नीती ही कशी पोकळ आहे, हे उपस्थितांना सांगितले. मोदींच्या चार वर्षांच्या कार्यकाळामध्ये काश्मीरची समस्या ही अत्यंत बिकट झाली आहे, असे त्यांनी सांगितले. कॉंग्रेस सरकारने गेल्या दहा वर्षांच्या काळात काश्मीरमध्ये एकही समस्या उद्भवू दिली नाही. परंतु गेल्या तीनच वर्षांमध्ये काश्मीरची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे, असे ते म्हणाले.

माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी देखील भाजप सरकारवर जोरदार टीका करत, भाजप परराष्ट्र नीतीबरोबरच अर्थनीतीमध्ये देखील फसले असल्याचे त्यांनी म्हटले. मोदींनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाचे खूप मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी म्हटले.
 
@@AUTHORINFO_V1@@