लोकलच्या पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Mar-2018
Total Views |

 
 
मुंबई : आज रविवार आणि गुढी पाडव्याच्या समानिमित्त मुंबई येथे लोकलच्या पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्याचे रेल्वे विभागातर्फे ठरवण्यात आले आहे.
 
मध्य रेल्वेवर कल्याण ते ठाणे अप फास्ट मार्गावर, हार्बर रेल्वेमार्गावर कुर्ला ते मानखुर्द अप आणि डाऊन लाईनवर, तर पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेन्ट्रल अप व डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वेच्या तीनही मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काही वेळ त्रास सहन करावा लागणार आहे.
 
मध्य रेल्वेच्या मुख्य लाईनवर कल्याण ते ठाणे अप फास्ट मार्गावर उद्या मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी ११.१५ वाजल्यापासून दुपारी ४.१५ वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असेल. त्यामुळे फास्ट मार्गावरील वाहतूक कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान अप स्लो मार्गावर वळविण्यात येणार आहे.
 
पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेन्ट्रल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर उद्या मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असेल. त्यामुळे चर्चगेट ते मुंबई सेन्ट्रल स्थानकांदरम्यान फास्ट मार्गावरील लोकल्स स्लो मार्गावर चालवण्यात येणार आहेत.
 
हार्बर रेल्वेमार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरु असेल.
@@AUTHORINFO_V1@@