भारत वि. बांगलादेश : अंतिम सामन्याला सुरुवात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Mar-2018
Total Views |


कोलंबो : भारत आणि बांगलादेश यांच्यातील निदास चषकासाठीच्या अंतिम सामन्याला कोलंबो येथे सुरुवात झाली आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आतापर्यंत श्रीलंकेने आपले तीन गडी देखील गमवले आहेत. भारतीय संघाने उत्तमरीत्या आपल्या खेळाला सुरुवात केली असून ५ षटकांमध्ये बांगलादेशाच्या ३ बाद ३३ धावा अशी स्थिती झाली आहे.

कोलंबो येथील आर.प्रेमदास या मैदानावर आजच्या या अंतिम सामन्याला सुरुवात झाली आहे. बांगलादेश संघ हा सध्या फलंदाजी करत असून बांगलादेशकडून शब्बीर रहमान (५) आणि मुशफिकुर रहीम (०) हे दोघे मैदानात खेळत आहेत. या अगोदर खेळण्यासाठी आलेल्या तमिम इक्बाल (१५), लितोस दास (११) आणि सौमय्या सरकार (१) या तिघांनाही चहल आणि सुंदर यांनी माघारी धाडले आहे. त्यामुळे भारतीय संघात आणि संघाच्या चाहत्यांमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

निदास चषकाच्या उपांत्यफेरीत श्रीलंकेच्या संघावर रोमहर्षक विजय मिळवून बांगलादेश संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे बांगलादेश संघाने श्रीलंकेवर तब्बल दोन वेळा या स्पर्धेत विजय मिळवला आहे, तर भारतीय संघाने सलग दोन वेळा बांगलादेश संघा पराभव केलेला आहे. पूर्ण स्पर्धेमध्ये भारताने फक्त एकदाच पराभव पत्कारला असून उरलेल्या सर्व सामन्यांमध्ये विजय मिळवलेला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात देखील भारतीय संघाचे पारडे जड असल्याचे दिसत आहे, तसेच हा सामना देखील भारतीय संघच जिंकेल, अशी भावना भारतीय संघाच्या चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे.
@@AUTHORINFO_V1@@