राज्यात गुढी पाडव्यानिमित्त उत्साहाचे वातावरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Mar-2018
Total Views |

 
 
पुणे :  आज गुढी पाडवा आहे. आज पासून हिंदु नववर्षाला प्रारंभ झाला आहे. यानिमित्ताने संपूर्ण राज्यात आज उत्साहाचे वातावरण आहे. घरोघरी सोनेरी गुढ्या उभारलेल्या दिसून येत आहे. काल यानिमित्ताने बाजारात देखील मोठ्या प्रमाणात गर्दी बघयला मिळाली. फुले आणि गाठ्यांची विक्री करण्यासाठी मोठ्या प्रमाणात दुकाने सजली होती.
 
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सगळ्यांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "गुढी सुप्रशासनाची, मांगल्याची, लोककल्याणाची, अन बदलत्या महाराष्ट्राची" अशा शब्दात त्यांनी गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
 
 
 
 
 
या निमित्ताने पुणे - मुंबईसह अनेक ठिकाणी पहाटे शोभायात्रांचेही आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला - पुरुष आणि लहान मुलांनी पारंपारिक वेशभूषा धारण करत सहभाग नोंदवला. अनेक ठिकाणी ढोल पथकांनी देखील सादरीकरण केले. एकूणच संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोषाचं वातावरण आहे.
@@AUTHORINFO_V1@@