शेतकऱ्यांच्या विकासातच देशाचा विकास सामावलेला-खा. ए. टी. पाटील

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Mar-2018
Total Views |
 

शेतकऱ्यांच्या विकासातच देशाचा विकास सामावलेला

-खा. ए. टी. पाटील

जळगाव  17  मार्च 

 भारत हा कृषी प्रधान देश आहे. देशाचा सर्वांगिण विकास शेतकऱ्यांच्या विकासात सामावलेला आहे. असे मत जळगाव लोकसभा मतदार संघाचे खासदार ए. टी. पाटील यांनी शनिवाररोजी  असे व्यक्त केले.देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा बेव संदेश व शास्त्रज्ञ शेतकरी सुसंवाद कार्यक्रमांचे आयोजन मुमराबाद येथील कृषी विज्ञान केंद्र येथे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन  पाटील बोलत होते.
 

यावेळी व्यासपीठावर कृषीरत्न  विश्वासराव पाटील, शास्त्रज्ञ डॉ. विशाल वैरागर, प्रकल्प संचालक, (आत्मा), शिवाजी आमले, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, डॉ. संजय पाटील. डॉ. आर. एम. चौधरी आदि उपस्थित होते.

खा .  पाटील आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीतंत्राचा अवलंब करुन आपले शेतमालाचे उत्पादन वाढवावे. त्याचबरोबर चांगली बी बीयाणे वापरून शेतीवरील उत्पादन खर्च कमी करावा. ज्यामुळे आपल्या उत्पन्नात वाढ होईल. शेतमालावर प्रक्रिया करुन त्याचे मुल्यवर्धन करावे. आपला शेतमाल परदेशात निर्यात करण्यासाठी प्रयत्न करावा.

कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. विशाल वैरागर यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथील कृषी उन्नती मेळावा व राष्ट्रीय स्तरावरील सर्व कृषी विज्ञान केंद्राचे परिषदेत होणाऱ्या भाषणाचे वेबद्वारे संदेश या कार्यक्रमाचा उद्देश आपल्या प्रास्तविकात स्पष्ट केला.

या कार्यक्रमास जळगाव जिल्ह्यातील मोहाडी, खडका, शिरसोली, धानोरा, धामणगाव, ममुराबाद, पहूर, गाडेगाव, चिंचखेडा, डांभुर्णी, किनगाव, कासारखेडा, आडगाव चिंचोली, भोकर, भादली, अडावद, खडके खुर्द, पाळधी इ. गावातून शेतकरी व शेतकरी महिला बहुसंख्येने उपस्थित होते.

 
@@AUTHORINFO_V1@@