सततच्या मोर्चांमुळे होणारी वाहतूक कोंडी केव्हा थांबणार?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Mar-2018
Total Views |
 

शहर वाहतूक शाखेने दखल घेण्याची गरज

 
जळगाव :
जनतेने न्याय मागावा तर कुणाकडे, अशावेळी जनतेच्या मागण्यांसाठी जनतेला अखेर जिल्हाधिकारी कार्यालयाचे दार ठोठावे लागते. आपल्या मागण्यांसाठी मोर्चा काढून न्याय मागावा लागतो. मात्र, मोर्चा काढतांना पोलीस प्रशासनाने मोर्चासाठी वाहतुकीला अडथळा अन्यथा वाहतुकीची कोंडी होऊ नये, ही दक्षता घेण्याची खरी गरज असल्याचे आतापर्यंत सर्व रेकॉर्ड ब्रेक मोर्चांनी सिद्ध झाल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्यामुळे आता तरी पोलीस प्रशासनाने मोर्चाला परवानगी देतांना मोर्चाचा मार्ग बदलविण्याची अट मोर्चकर्‍यांना द्यावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य जळगावकरांनी सर्व समाजासह संघटनांच्या मोर्चामुळे व्यक्त केली आहे.
 
 
शासनापर्यंत जनतेला विविध मागण्यांच्या न्यायासाठी मोर्चाचा मार्ग अवलंबवा लागतो. यासाठी मोर्चेकरी शहरातील प्रमुख रस्ता हाच जनतेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. हजारोंसह लाखोंच्या संख्येने सर्व पक्षीय, समाज, संघटना अथवा इतरांचे मोर्चे निघतातही. त्यासाठी हा सर्व ताण खर्‍या अर्थाने पोलीस यंत्रणेसह वाहतुक पोलीस यंत्रणेवर येतो. मोर्चासाठी संबंधितांना आधीच परवानगी देतांना सर्व नियमांच्या अटींसह वाहतुकीला अडथळा होणार नाही, असा मार्ग देण्याची गरज आता खर्‍या अर्थाने निर्माण झाली आहे. तेव्हा, पोलीस प्रशासनाने जागरुक होण्याची गरज असल्याची अपेक्षा जनतेने आतापर्यंतच्या निघालेल्या मोर्चाद्वारे व्यक्त केली आहे
 
 
मोचेकर्‍यांनी दिलेल्या आदेशांचे उल्लंघन करु नये आणि त्यामुळे कुठलीही तेढ अथवा कायद्याची सुव्यवस्था कोलमडणार नाही यावर पोलीस प्रशासनाचा भर असतो. मात्र, अनेकवेळा वाहतूक व्यवस्थेचा खोळंबा झाल्यास अशावेळी जनतेकडून सहकार्य हवेे.
-राजेशसिंह चंदेल
वरिष्ठ पोलीस अधिकारी
 
 
मोर्चासाठी निघालेल्या मार्गावरुन जळगावचे अर्धे शहर ठप्प होते. त्यामुळे एखाद्या गंभीर रुग्ण दगावू शकतो. पोलीस प्रशासनाने परवानगी देतांना मोर्चेकर्‍यांना नियमांचे बंधन देण्याची खरी गरज आहे. मात्र दुर्दैवाने तसे होत नसल्याने शहरवासीयांना नाहक त्रास होतो.
-अनिल नाटेकर
नागरिक
 
 
मोर्चासाठी वरिष्ठांकडून आदेश आल्याशिवाय बंदोबस्त दिला जात नाही. त्यासाठी मोर्चाच्या स्थळापासून संपेपर्यंत वाहतूक पोलीस प्रशासनाची जबाबदारी असते. त्यामुळे स्थानिक पोलीस ठाणे आणि संबंधित पोलीस यांच्या जबाबदारीसह वाहतूक पोलीस काळजी घेतात.
- सागर शिंपी
वाहतूक पोलीस अधिकारी
 

असा असू शकेल मोर्चाचा मार्ग - १. पोलीस प्रशासनाने यापुढे वाहतुकीची समस्या पाहून मोर्चाला सिंधी कॉलनीतील संत बाबा हरदासराम मंगल कार्यालयापासून थेट आकाशवाणी चौक आणि येथून जिल्हाधिकारी कार्यालय २. मोर्चाला परवानगी देतांना पोलीस प्रशासनाने जनतेचे वाहतुकीचे हाल होणार नाही ही भूमिका लक्षात घेवून मोर्चाच्या मार्गाची अट टाकावी. यानंतर परवानगी द्यावी. ३. शहरातील प्रमुख मागार्ंवरुन निघणारे मोर्चांना पर्यायी मार्ग देऊन शहरवासियांच्या कामात येणारा अडथळा पोलीस प्रशासनाने थांबवावा, अशीही एक मागणी जनतेतून पुढे आली आहे.

 

मैदानाचा पर्याय - मोर्चा असो अथवा धरणे आंदोलन त्यासाठी मुुंबईचे आझाद मैदान केव्हाही नावारुपास आले आहे. मात्र, तेथे ज्याप्रमाणे पोलीस यंत्रणासह सर्व पथक सज्ज असतात. तशाच स्वरुपात जळगावातील वारंवार निघणारे मोर्चांमुळे होणारी गैरसोय थांबणार तरी कधी, असा प्रश्न आहे.

@@AUTHORINFO_V1@@