शेअर बाजाराबाबत भाकित करणे अत्यंत अवघड!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Mar-2018
Total Views |

 

तज्ञांमध्ये नाही एकवाक्य ता! ट्रेडर्सना टिप्स देणे कठीणच

 
काही तज्ञांच्या मते सेन्सेक्स ४० हजार बिंदूंपर्यंत जाणार?
कांद्याच्या भावात मोठी घट
सोने, चांदी चकाकली
 
 
गेल्या काही दिवसांपासून दक्षिणे(मंदी)ची दिशा पकडले ल्या शेअर बाजाराबाबत निश्‍चित भाकित करणे खरोखर च अवघड झाले आहे. मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक त्याच्या ३६ हजार ४४३ बिंदूंच्या सर्वोच्च पातळी वरुन सुमारे दहा टक्क्याने घसरलेला असून राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक(निफ्टी)देखील तेवढयाच प्रमाणात कमी झालेला आहे. आता बाजार येथून कोणत्या दिशे(दशे!)कडे जाणार याबाबत तज्ञांमध्ये अजूनही एकवाक्यता झालेली नाही. बहुतेकांच्या मते बाजार हा विशिष्ट मर्यादेत राहील.
 
 
नेमके काय घडेल यासाठी अल्पकालीन सकारात्मक(पॉझिटिव्ह) तसेच नकारात्मक (निगेटिव्ह) संकेतांवर नजर ठेवावी लागेल. सध्या तरी यापैकी कुठलेली संकेत आलेले नाहीत. त्यामुळे बाजार ठराविक मर्यादेत (रेंजबाउंड)राहील असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. बाजार दृढीकरणाच्या अवस्थे(कन्सॉलिडेशन)मध्ये राहण्याचीही शक्यता काही तज्ञांनी व्यक्त केली आहे.
 
 
त्यामुळे बाजारात नियमित पणे व्यवहार करणार्‍यां(ट्रेडर्स)साठी कुठल्याही टिप्स किंवा कॉल देणे तज्ञांना कठीण जात आहे. पण मध्यम अवधीसाठी गुंतवणुकदारांना हळूहळू काही संधी मिळू लागतील. बाजारा तील या मोठ्या घसरणीनंतर चांगल्या दर्जाचे शेअर्स स्वस्तात मिळत आहेत. त्यात वस्त्रोद्योग क्षेत्राचा प्रामुख्याने समावेश आहे. या क्षेत्रातील कंपन्यांचे दर्जेदार मिडकॅप शेअर्स चांगल्या भावात मिळून राहिले आहेत. मध्यम अवधीसाठी ते गुंतवणुक दारांना चांगला फायदा मिळवून देऊ शकतात.
 
 
याउलट काही तज्ञांनी म्हटल्यानुसार येत्या २०१८-१९ या आर्थिक वर्षात सेन्सेक्स ३५ हजार ते ४० हजार बिंदूंदरम्यान राहण्याची शक्यता आहे. तर काहींच्या मतानुसार हा निर्देशांक ३० हजार ते ३५ हजार बिंदूंदरम्यान राहणार आहे . तसेच निफ्टीदेखील वरच्या दिशेने ११ हजार ५०० ते १२ हजार बिंदूंदरम्यान किंवा खालच्या दिशेने १० हजार ५०० ते ११ हजार ५०० बिंदूं दरम्यान राहू शकतो.
 
 
देशातील दुसर्‍या क्रमांकाची माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी असलेली कंपनी इन्फोसिस ही येत्या १३ एप्रिल रोजी जानेवारी ते मार्च तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे. त्याआधी म्हणजे १२ एप्रिल रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक होणार असून तीत लेखापरीक्षण करण्यात आलेल्या कंपनीच्या वित्तीय कागदपत्रांवर चर्चा केली जाणार आहे.
 
 
कांद्याच्या किंमतीत सध्या मोठी घसरण झालेली आहेे. महाराष्ट्रातील अनेक बाजारपेठां मध्ये कांद्याचा प्रति क्विंटल भाव ५०० रुपये किंवा त्यापेक्षाही खाली गेला आहे. कांद्याची देशातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव येथे कांदा ४०० ते ८०० रुपये प्रति क्विंटल भावाने विकला गेला आहे. म्हणजेच प्रति किलोग्रॅममागे कांदा उत्पादक शेतकर्‍याला अवघे चार ते आठच रुपये मिळत आहेत.
 
 
तर उत्तर महाराष्ट्रातील अनेक बाजारपेठात कांदा ३०० रुपयांपर्यंत गडगडला आहे. याचे कारण म्हणजे कांद्याची मोठ्या प्रमाणावर होणारी आवक होय. त्यामुळे कांद्याच्या किंमतींवर दबाव येऊ लागलेला आहे. यात विशेष महत्वाची बाब म्हणजे कांद्याच्या निर्यातीला सरकारने हरप्रकारे उत्तेजन देऊनही त्याच्या किंमतींना कुठलाही आधार उरलेला नाही. गेल्या महिन्याभरापासून कांद्याच्या किंमती तब्बल २५ टक्क्यांनी घसरलेल्या आहेत. पण यामुळे शेतकर्‍यांच्या ‘डोळ्यात पाणी आले’ आहे.
 
 
अमेरिकन फेडरल बँकेच्या पुढील आठवड्यातील बैठकीत व्याजदर वाढीवर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्याआधीच सोन्याची चमक फिकी पडली आहे. जागतिक बाजारात सोन्याचा भाव गेल्या दोन वर्षातील सर्वात कमी पातळीवर आलेला आहे. पण देशांतर्गत बाजारात मात्र सोने चकाकले आहे. त्याचा भाव प्रति दहा ग्रॅमला ३० हजार ३३३ रुपये इतका वाढला आहे. चांदीदेखील चमकली असून तिचा भाव प्रति किलोमागे ३८ हजार ६७४ रुपये इतका झाला होता. दरम्यान भारतीय रिझर्व बँकेने देशांतर्गत कंपन्यांना विदेशी एक्सचेंजेसमध्ये हेजिंग करण्यास मनाई केली आहे. हा आदेश येत्या एप्रिलपासून लागू होणार आहे. त्यामुळे आता देशांतर्गत एक्सचेंजेस मध्येच गुंतवणुकदारांना हेजिंग करता येणार आहे.
 
 
कच्च्या खनिज तेला(क्रूड)च्या किंमतींवर सध्या दबाव येत आहे. याचे कारण म्हणजे अमेरिकेतील क्रूडच्या उत्पादनात झालेली वाढ होय. क्रूडच्या मागणीत मोठी वाढ होणार असल्याचे अनुमान असले तरी त्याचा क्रूडच्या किंमतींवर परिणाम होणार नाही.
 

आठवड्याच्या अखेरच्या दिवशी बाजारात मोठी घसरण - शेअर बाजारात आज आठवडयाच्या शेवटच्या दिवशी मोठी घसरण झाली होती. त्याचे सेन्सेक्स व निफ्टी हे दोन्ही निर्देशांक चांगलेच कोसळले होते. सेन्सेक्स गुरुवारच्या बंद ३३ हजार ६८५बिंदूंच्या तुलनेत आज ५०९ बिंदूंनी गडगडून दिवसअखेर ३३ हजार १७६ बिंदूंवर तर निफ्टी कालच्या बंद १० हजार ३६० बिंदूंंच्या तुलनेत १९५ बिंदूंनी कोसळून आज १० हजार १९५ बिंदूंवर बंद झाला. मिडकॅप शेअर्सनीही आजच्या घसरणीस ‘हातभार’ लावला. मिडकॅप निफ्टी निर्देशांक एका टक्क्याने गडगडला.

@@AUTHORINFO_V1@@