तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे भविष्य घडेल : नरेंद्र मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
नवी दिल्ली : तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे भविष्य घडेल असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. आज नवी दिल्ली येथे ‘कृषी उन्नती मेळाव्या’त जनतेला संबोधित करतांना ते बोलत होते. यावेळी नरेंद्र मोदी यांनी २५ कृषी विज्ञान केंद्राचे आणि जैविक शेती पोर्टल यांचे उद्घाटन केले. तसेच यावेळी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कृषी कर्मण पुरस्काराचे वितरण देखील करण्यात आले.
 
 
 
 
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अन्नधान्य उत्पादनाची परिस्थिती काय होती हे सगळ्यांना माहिती आहे. मात्र त्यावेळी आपल्या शेतकऱ्यांनी खूप मेहनत घेतली आणि आज ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. धान्योत्पादनाची नोंद, डाळींचे विक्रमी उत्पादन, विक्रमी फळे - भाजीपाला उत्पादन, देशातील दुग्ध उत्पादन यात भारताचा क्रमांक उच्च श्रेणीत आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
 
 
 
आपल्या देशाने शेती क्षेत्रात संपूर्ण जगाला मार्ग दाखविला आहे. परंतु कालांतराने आजच्या काळातील शेतीसोबत वाढणारी आव्हाने ही फार महत्वाची आहेत आणि त्याकडे लक्ष देणे तितकेच गरजेचे आहे. ‘प्रधानमंत्री किसान योजनें’तर्गत सरकार ‘आधुनिक एग्रीकल्चर इंफ्रास्ट्रक्चर’ तयार करीत आहे. तसेच शेतापासून बाजारपेठेपर्यंत संपूर्ण साखळी मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहे असेही ते यावेळी म्हणाले. 
 
 
 
 
 
शेतकऱ्यांच्या हिताचा Model Act लागू करण्याची विनंतीही राज्य शासनाला करण्यात आली आहे. राज्यांमधील अंमलबजावणीनंतर शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी हे कायदे कार्य करतील. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. तसेच शेतातील अवजार विकत घेण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना अर्थसाह्य देखील करीत आहे असेही ते यावेळी म्हणाले. 
@@AUTHORINFO_V1@@