कल्पना चावला हिची आज ५६ वी जयंती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला कल्पना चावला हिची आज ५६ वी जयंती आहे. कल्पना चावला हिचा जन्म १७ मार्च १९६२ रोजी झाला. तिच्या वडिलांचे नाव बनारसीलाल चावला तर आईचे नाव संयोगीता चावला असे होते. तिला एक भाऊ व एक बहिण होती. लहानपणापासूनच कल्पना चावला हिला नटणे, घरकाम यापेक्षा जास्त मित्र मैत्रिणींबरोबर सायकलने ट्रीपला जाण्यात आवडत होते.
 
 
 
कल्पना चावला हिचे शालेय शिक्षण गावातील टागोर बाल निकेतन विद्यालयात झाले. कल्पना चावला हुशार असल्याने ती नेहमी पहिल्या पाच मुलांमध्ये होती. पंजाब विद्यापीठातून तिने १९८२ साली एरोनॉटिकल अभियांत्रिकी पदवी घेतली. पुढे १९८४ मध्ये अर्लिंगटन टेक्सास विद्यापीठातून एरोनॉटिकल उच्च अभियांत्रिकी शिक्षण घेऊन, तिने कॉलोरॅडो विदयापीठांतून एरोस्पेस अभियांत्रिकी विभागातून १९८८ मध्ये डॉक्टरेट मिळवले.
 
  
 
१ फेब्रुवारी २००३ या दिवशी अवकाशातून पृथ्वीवर परत येणार्‍या कोलंबिया अवकाशयानाचा स्फोट झाला. या स्फोटामुळे कोलंबियाचे अक्षरश: तुकडे तुकडे झाले. या यानामध्ये असलेल्या कल्पना चावला हिचा आणि अन्य अंतराळवीरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यावेळी कल्पना चावला ही ४० वर्षांची होती. 
@@AUTHORINFO_V1@@