चारा घोटाळ्याप्रकरणी लालू यादव यांच्यावर आज सुनावणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
रांची : चारा घोटाळा प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेले राजद प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव आज रांची येथे न्यायालयासमोर हजर झाले आहेत. सीबीआयच्या विशेष न्यायालयात चारा घोटाळा प्रकरणी ही सुनावणी आहे. चारा घोटाळाप्रकरणाच्या चौथ्या प्रकरणाबाबत ही सुनावणी होणार आहे.
 
 
 
काय आहे प्रकरण ?
 
चारा घोटाळा हा बिहारच्या राजकारणातील आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा मानला जातो. १९९६ मध्ये पशू खाद्यासाठी सरकारी खजिन्यातून ९५० कोटी रुपये घेण्यात आले होते, परंतु त्यावेळचे बिहारचे मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेस नेते जगन्नाथ मिश्रा यांनी हे सर्व पैसे खाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला होता. यानंतर भाजपने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती, यामध्ये लालू यांच्या हात असल्याचे दिसू लागल्यानंतर लालू यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर न्यायालयाने त्यांना यात दोषी ठरवत या निवडणूक बंदी देखील घातली होती.
 
 
@@AUTHORINFO_V1@@