विनाअनुदानित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांच्या मागण्यांसाठी शासन सकारात्मक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Mar-2018
Total Views |

चर्चेसाठी विशेष बैठक बोलवण्याचे शिक्षमंत्र्यांचे आश्वासन

 

 
मुंबई : राज्यातील विनानुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांच्या अनुदान, निवृत्ती वेतन, वैद्यकीय प्रतिपूर्तीसारख्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत दिली. शालेय शिक्षण विभाग आणि नगर विकास विभागंतर्गत येणा-या शाळेतील शिक्षकांच्या मागण्यांसदर्भात चर्चा करण्यासाठी दालनात विशेष बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
 
मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णायानुसार राज्यातील पात्र शाळांना २० टक्के अनुदान अनुज्ञेय करण्यात आले आहे. तसेच या निर्णयानुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना सरसकट २० टक्के अनुदान अनुज्ञेय आहे. मात्र निवृत्ती वेतन, वैद्यकीय प्रतिपूर्ती १०० टक्के अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना लागू करण्यात येणार असल्याचे तावडे म्हणाले.
 
राज्यातील १७२ अतिरिक्त शिक्षकांची यादी तयार करण्यात आली आहे. पुन्हा होणा-या शिक्षक भरती दरम्यान या अतिरिक्त शिक्षकांना प्राधान्याने भरती करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील कायम विना अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयात शिकणा-या ७० टक्के विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती मिळते. बहुजन आणि ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना या महाविद्यालयांद्वारे गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात यावे. तसेच ग्रामीण भागातील विना अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयांचा कायम हा शब्द काढण्यात येण्यासंदर्भात शासन विचार करेल, असे ते यावेळी म्हणाले.
 
@@AUTHORINFO_V1@@