सत्तेच्या अहंकारापुढे आम्ही झुकणार नाही : सोनिया गांधी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
नवी दिल्ली : सत्तेच्या अहंकारापुढे काँग्रेस पक्ष झुकणार नाही असे मत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी व्यक्त केले आहे. आज नवी दिल्ली येथे झालेल्या ८४ व्या काँग्रेस महाअधिवेशनात त्या बोलत होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने काँग्रेसला खाली पाडायचा खूप प्रयत्न केला मात्र काँग्रेस झुकली नाही आणि झुकणारही नाही अशा स्पष्ट भाषेत आज सोनिया गांधी यांनी उत्तर दिले आहे.
 
 
 
 
देशाला केवळ काँग्रेस पक्षच मार्ग दाखवू शकतो. काँग्रेस पक्ष शांततेचा मार्ग स्वीकारते मात्र सत्तेत असणारा पक्ष क्रोधाचा मार्ग अवलंबून राजकारण करतात आणि काँग्रेस पक्ष देशातील प्रत्येक व्यक्तीसाठी काम करेल असा विश्वास यावेळी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी यावेळी व्यक्त केला. काँग्रेस पक्ष समाजाच्या प्रत्येक घटकासाठी कार्य करेल असेही ते यावेळी म्हणाले.
 
 
 
 
आज देशामध्ये व्यक्तीव्यक्तींमध्ये भांडण लावले जात असून देशामध्ये हिंसेचे वातावरण पसरविले जात आहे त्यामुळे आपल्याला सगळ्यांना मिळून आज देशाला एकत्रित आणायचे आहे आणि देशाला नकारात्मक विचारधारेतून बाहेर काढायचे आहे असेही ते यावेळी म्हणाले. तरुणांनी रोजगारासाठी कोणाकडे पहायचे?, शेतकऱ्यांनी रोजगारासाठी कोणाकडे पहायचे? असे प्रश उपस्थित केले तर आपला काँग्रेस पक्षच या सगळ्यांना मार्ग दाखवू शकतो असे त्यांनी यावेळी म्हटले. 
@@AUTHORINFO_V1@@