तालिबानला पाकिस्तानचे संरक्षण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Mar-2018
Total Views |

अमेरिकेच्या लष्कर अधिकाऱ्यांची माहिती 




वॉशिंग्टन :
अफगाणिस्तानमध्ये धुमाकूळ घालत असलेल्या तालिबानला पाकिस्तानकडून सातत्याने मदत तसेच संरक्षण पुरवले जात आहे, असे माहिती अमेरिकेचे लष्कर अधिकारी जनरल जोसेफ वोटेल यांनी दिली आहे. वॉशिंग्टन डी.सी. येथे 'सिनेट आर्म सर्विस कमिटीच्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.

'आयएसआय ही पाकिस्तानची गुप्तचर संघटना पाक-अफगाण सीमेजवळ मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. ही संघटना अमेरिकन सैन्याच्या सर्व हालचाली टिपून त्याची माहिती तालिबानला देत असते. त्यामुळे अफगाणिस्तानमध्ये होणाऱ्या सर्व हल्ल्यांमध्ये तालिबानला यश मिळत आहे.' असे जोसेफ यांनी म्हटले.
याच बरोबर पाकिस्तानमधील क्वेटा, बलुचिस्तान आणि पश्तूनच्या काही भागांमध्ये जमात उल्मा ए इस्लाम ही संघटना कार्यरत असून या संघटनेकडून तालिबानसाठी नवे सैनिक तयार केले जात आहेत, असेही जोसेफ यांनी म्हटले आहे. याच बरोबर या इस्लामिक संघटनेला आयएसआय आणि पाकिस्तान सैनिकांकडून आवश्यक ती सर्व मदत देखील केली जाते, असे त्यांनी या बैठकीत स्पष्ट केले आहे.
दरम्यान पाकिस्तानच्या दहशतवादासंबंधीच्या दुटप्पी धोरणामुळे अमेरिकेने या अगोदरच पाकिस्तानची अनेक वेळा कानउघडणी केली आहे. तसेच पाकिस्तानला देण्यात येणारी सर्व प्रकारची आर्थिक मदत देखील रोखली आहे. तरी देखील पाकिस्तानकडून दहशतवाद्यांविरोधात कसलीही कारवाई केली जात नाही. गेल्या काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने अफगाणमध्ये केलेल्या ड्रोन हल्ल्यामध्ये २१ तालिबान दहशतवादी ठार झाले होते. विशेष म्हणजे हे सर्व पाकिस्तानचेच होते. त्यामुळे जोसेफ यांच्या या माहितीनंतर अमेरिका यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
@@AUTHORINFO_V1@@