पुलंच्या जन्म'शताब्दीनिमित्त 'ग्लोबल पुलोत्सव'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Mar-2018
Total Views |


पुणे :
मराठीतील प्रसिद्ध विनोदी लेखक पु.ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त यंदा जगभर 'ग्लोबल पुलोत्सव' साजरा करण्यात येणार आहे. आशय सांस्कृतिक, पुण्यभूषण प्रतिष्ठान, पु.ल.परिवार आणि स्क्वेअर वन यांच्या संयुक्त विद्यमानाने हा पुलोत्सव साजरा करण्यात येणार असून या उत्सवाच्या बोधचिन्हाचे काल पुण्यामध्ये अनावरण करण्यात आले.

या वर्षी ८ नोव्हेंबरपासून पु.ल. यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात होत आहे. जगभरातील मराठी जणांच्या मनात पू.ल. यांनी एक आढळस्थान निर्माण केले असून त्यानिमित यावर्षीच्या ८ नोव्हेंबरपासून ते २०१९च्या ८ नोव्हेंबरपर्यंत वर्षभर देशातील २० तर पाच खंडांमधील ३० शहरांमध्ये पुलोत्सव साजरा करण्याचा संकल्प आयोजकांकडून सोडण्यात आला. यानिमित्त काल पुण्यात पत्रकार परिषद घेऊन याविषयी घोषणा करण्यात आली. तसेच ज्येष्ठ साहित्यिक द.मा.मिरासदार यांच्या हस्ते या पुलोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.प्रसिद्ध
@@AUTHORINFO_V1@@