नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘भारतीय विज्ञान काँग्रेस’ कार्यक्रमाचे उद्घाटन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
मणिपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज १०५ व्या ‘भारतीय विज्ञान काँग्रेस’ कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले आहे. आज मणिपूरची राजधानी इंफाळ येथे या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले आहे. १६ ते २० मार्च या कालावधीत होणाऱ्या या कार्यक्रमात जगातील वैज्ञानिक, विद्वान आणि व्यावसायिक अधिकाऱ्यांचा समावेश यात असणार आहे. या कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्ध ब्रिटीश खगोलशास्त्रज्ञ आणि कृष्ण विवराचे जनक डॉ. स्टीफन हॉकिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली.
 
 
या कार्यक्रमात ५००० प्रतिनिधी भाग घेणार आहेत. विज्ञानाच्या दृष्टीने हा कार्यक्रम महत्वाचा मानला जात असून यावर्षी या कार्यक्रमाचे १०५ वे वर्ष आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय वैज्ञानिकांना सामाजिक उत्तरदायित्वासाठी प्रोत्साहित केले तसेच वर्तमानातील समस्यांवर काही उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली. तसेच यावेळी नरेंद्र मोदी यांनी ‘राष्ट्रीय खेळ विश्व विद्यापीठा’ची पायाभरणी केली.
 
 
 
भारतामधून टीबी रोग पूर्णपणे नष्ट करण्यासाठी आम्ही एकत्रित प्रयत्न करीत आहोत. भारतीय अंतराळ संशोधन प्रकल्पात एकाच वेळी १०० उपग्रह प्रक्षेपित करण्याची क्षमता आहे. हे भारतीय वैज्ञानिकांच्या कठोर परिश्रम आणि समर्पण वृत्तीमुळेच शक्य झाले आहे असे मत यावेळी नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. समाजापर्यंत आपली वैज्ञानिक कामगिरी पोहोचणे गरजेचे आहे. यामुळे युवकांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित होण्यास मदत मिळेल असेही ते यावेळी म्हणाले. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@