महिला पोलिस अधिकार्‍याचा विनयभंग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Mar-2018
Total Views |
 
महिला पोलिस अधिकार्‍याचा विनयभंग
जळगाव , १६ मार्च
येथील विशेष सुरक्षा शाखेती पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या महिला अधिकार्‍याच्या राहत्या घरात घुसून तिला मारहाण करून शिवीगाळ करून लज्जास्पद वर्तन केले.म्हणून जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
 
जळगाव पोलिस दलाच्या विशेष सुरक्षा पथकात 28 वर्षीय महिला पोलिस उपनिरिक्षक पदावर कार्यरत आहे. 15 रोजी पोलिस कवायत मैदान,रूम नंबर 9, तापी बिल्डिंग येथे राहत असतांना त्याठिकाणी रात्री 7 ते 8 वाजेदरम्यान आरोपी बाबुलाल दरबार राठोड रा. अजनाड बगला ता. शिरपूर जि. धुळे हा आला. त्याने महिला पोलिस उपनिरिक्षक यांच्या हात उचलून अश्‍लिल शिवीगाळ करून लज्ज उत्पन्न होईल असे वर्तन केले.म्हणून शुक्रवाररोजी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात आरोपीविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
 
आरोपी बाबुलाल दरबार राठोड याची मैत्रीण या महिला अधिकार्‍यासोबत .या दोघीजण रूमवर असतांना या भावी वराने दरवाजा उघडताच मारहाण केली.यावेळी महिला पोलिस अधिकारी यांनी भावाला मोबाईल करून बोलविले . त्या भावीवर यास जाण्यास सांगितले. दरम्यान तापी ही इमारत पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या जवळच आहे. या घटनेबद्दल पोलिस कर्मचारी व अधिकार्‍यांमध्ये चर्चा सुरू आहे. त्यावरून आरोपी बाबुलाल राठोड याच्या विरूद्ध भाग 5 ग.र.नं.38/18 भादंवि. कलम 354(ब), 452, 323, 506 प्रमाणे पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आले असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुर्यवंशी करीत आहे.
-
 
@@AUTHORINFO_V1@@