रिड ग्रंथालयासाठी २० हजारांची पुस्तके

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Mar-2018
Total Views |
 
रिड ग्रंथालयासाठी २० हजारांची पुस्तके
 
 
भुसावळ - येथील गटसाधन केंद्रात स्थापन करण्यात येणार्‍या रिड ग्रंथालयासाठी तालुक्यातील दीपनगर येथील श्री शारदा माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातर्ङ्गे सुमारे २० हजार रूपये किंमतीच्या १२५ पुस्तकांचा संच भेट म्हणून देण्यात आला.
 
यावेळी गटशिक्षणाधिकारी महेंद्र धिमते, शालेय पोषण आहार अधिक्षक सुमित्र अहिरे, शिक्षण विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण, मुख्याध्यापक एस.एस. जंगले, पूर्व माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संचालक संजू भटकर, एन.एस. सपकाळे, निलेश नेहेते, गणेश सरोदे, गटसाधन केंंद्रातील संजय गायकवाड, रमेश दांगोडे, शैला कुमावत आदींची उपस्थिती होती. शालेय पोषण आहार अधिक्षक सुमित्र अहिरे यांच्या परिश्रमातून साकार होत असलेल्या अतिशय स्तुत्य असा उपक्रम रिड ग्रंथालयासाठी आतापर्यंत सुमारे पाचशेच्या वर विविध विषयांवरची पुस्तके जमा झाली आहेत.
 
@@AUTHORINFO_V1@@