अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी आकरूपे यांचे निलंबन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Mar-2018
Total Views |





विरोधीपक्ष नेत्यांच्या कार्यालयात दमदाटी केल्याने निलंबनाचा निर्णय


मुंबई : अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी आर. डी. अकरूपे यांचे निलंबन करण्याचा निर्णय अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी घेतला. विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या विधानभवनातील कार्यालयात येऊन गुटखाबंदी संदर्भातली लक्षवेधी सूचना मांडल्याबाबत सदर अधिकाऱ्याने दमदाटी केल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.


विधानपरिषदेत गुटखाबंदी संदर्भातली लक्षवेधी सूचना का उपस्थित केली असे म्हणत अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी आर. डी. अकरूपे यांनी भाजप आमदारासह आपल्या विधान भवनात कार्यालयात येऊन धमकी दिली असा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत केला. यानंतर भिवंडीचे अन्न सुरक्षा अधिकारी अकरुपे यांना निलंबित करण्याची मागणी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी केली. जो पर्यंत अधिकारी निलंबित होत नाही तो पर्यंत कामकाज चालणार चालू देणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली. दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेऊन या अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करा, असे आदेश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सरकारला दिले.त्यानंतर अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीष बापट यांनी सभागृहात सांगितलेली माहिती सत्य मानून अकरुपे यांच्या निलंबनाची घोषणा केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे किरण पावसकर यांनी संबंधित आमदारावर कारवाई करण्याची मागणी केली.


तसेच त्यापीर्वी या घटनेचा निषेध करण्यासाठी सभागृहाचे कामकाज अर्धा तास तहकूब करण्यात आले. त्यानंतर या संदर्भात निर्णय होईपर्यंत कामकाज पुन्हा अर्ध तासस्थगित करण्यात आले होते.

@@AUTHORINFO_V1@@