पंकजा मुंडे यांच्या हस्ते 'वूमन इंडिया ऑर्गेनिक फेस्ट २०१८' चे उद्घाटन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
 
मुंबई : राज्याच्या ग्रामविकास, महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते आज मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे सेंद्रिय शेती उत्पादनांच्या 'वूमन इंडिया ऑर्गेनिक फेस्ट २०१८' चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अभिनेत्री आणि या कार्यक्रमाची ब्रँड अॅम्बेसिडर जुही चावला, ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा मुखर्जी, तनिषा मुखर्जी, अभिनेत्री मधू, अभिनेते जॅकी श्रॉफ, महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्या संयुक्त सचिव नंदिता मिश्रा, राज्यमंत्री विद्या ठाकूर आणि आमदार तृप्ती देसाई आदी उपस्थित होते.
 
 
 
हा कार्यक्रम महिला व बालविकास मंत्री, केंद्रीय कॅबिनेट मंत्री मनेका गांधी आणि महिला अर्थ विकास महामंडळ, महाराष्ट्र यांच्या वतीने घेण्यात येत आहे. तसेच आजपासून सकाळी १० ते संध्याकाळी ८ या वेळेत, २० मार्च २०१८ पर्यंत सुरु राहणार असून भारतातील सुमारे ५०० महिला उद्योजकांनी वेगवेगळ्या भागांमधून आणलेली १०० टक्के सेंद्रिय शेती उत्पादने येथे उपलब्ध होणार आहेत. तसेच मुंबईकरांचा या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
 
 
 
 
सेंद्रिय शेतीचे महिलांना बहुविध फायदे आहेत, महिला यातील प्रमुख भागधारक असल्यामुळे त्यांना विविध व्यावहारिक संधीही यातून उपलब्ध होणार आहेत. आमचे सरकार सेंद्रिय शेती द्वारे महिला सक्षमीकरणाच्या विकासासाठी निरंतर प्रयत्नशील आहे, असे नंदिता मिश्रा यांनी यावेळी सांगितले.
 
 
 
यावेळी पंकजा मुंडे यांनी सेंद्रिय उत्पादनाचा वापर वाढावा, यासाठी महिला बचत गटाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत आहोत, या प्रत्यत्ना यश मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली. तसेच प्लास्टिक बॅनचा निर्णय महाराज्य राज्य सरकारने घेतला, त्यासाठी पर्यावरण मंत्री रामदास कदम व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करत हा निर्णय महाराष्ट्राच्या जनतेसाठी आवश्यक असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या. 
 
@@AUTHORINFO_V1@@