गुटखा विक्रेत्यांनावर कडक कारवाई करणार- गिरीश बापट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Mar-2018
Total Views |

 
मुंबई : राज्यात गुटखाबंदीसह खर्रा, मावा व सुगंधी सुपारीवर देखील बंदी आहे, तरीही राज्यात चोरून गुटखा आणला जातो. हे रोखण्यासाठी यासंदर्भात अधिक कडक पाऊले उचलण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.
 
राज्यातील गुटखा व तत्सम पदार्थांना असलेल्या प्रतिबंधासंदर्भात सदस्य परिणय फुके यांनी प्रश्न उपस्थित केला होता. श्री. बापट म्हणाले, गुटखाबंदी कायद्यात अधिक सुधारणा करण्यात येणार आहेत. या कायद्याअंतर्गत हा गुन्हा अजामीनपात्र गुन्हा ठरणार आहे. तसेच दोषी आढळल्यास किमान सात वर्षांची शिक्षा तसेच आवश्यकता पडल्यास मोक्का लावण्यात येणार आहे. या शिक्षेबाबत माहिती व्हावी म्हणून केंद्र शासनाच्या निर्देशानुसार याबाबतचे लोक प्रबोधन करण्यात येणार आहे. यासाठी काही खासगी संस्थाही पुढे आल्या आहेत. त्यांच्या सी एस आर निधीचीही मदत घेतली जाणार आहे. काल झालेल्या जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्तानेही ग्राहक चळवळीत काम करणाऱ्या संस्थांना याबाबत समाजात जागरूकता निर्माण करण्यासंबंधी सूचना देण्यात आल्या आहेत. शाळा महाविद्यालये यांच्या परिसरात गुटखाबंदी राबविण्यात येत आहे. आतापर्यंत विविध ठिकाणी टाकण्यात आलेल्या धाडींमधून १४ कोटी रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. गुटखा निर्मुलनासाठी शासन कटिबद्ध आहे.
 
या विषयावर झालेल्या चर्चेत सदस्य जयंत पाटील, अनिल परब आणि विद्या चव्हाण आदिंनी सहभाग घेतला.
 
@@AUTHORINFO_V1@@