बिप्लव देव सरकार लागले कामास ...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Mar-2018
Total Views |

 
 
 
आगरताळा : त्रिपुरा निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन आता  जवळपास दोन आठवडे होत आले आहेत. भारतीय जनता पक्षाने तेथे ऐतिहासिक विजय मिळवला व २५ वर्षांपासून सत्तेत असलेले माणिक सरकार व त्यांचा पक्ष भारतीय साम्यवादी पक्ष यांचा पराभव करत सत्ता हस्तगत केली. या धक्क्यातून अजून सीपीएम व माणिक सरकार सावरलेही नसतील तोपर्यंत बिप्लव कुमार देव सरकारने आपल्या कामाला धडाक्यात सरुवात केली आहे.
 
 
 
आपल्या कामाची सुरुवात त्यांनी जनता दरबाराने केली आहे. त्यासंंबंधी त्यांनी आपल्या ट्वीटरवरून ही माहिती दिली आहे. त्रिपुराच्या जनतेची सर्वांत मोठी समस्या म्हणजे त्यांचे गाऱ्हाणे कोणीही ऐकून घेत नसे. त्यामुळे जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेच्या नेमक्या समस्या, दुःखे जाणून घेण्याचे देव यांनी ठरवले आहे. त्या दृष्टीने त्यांचे प्रशासनही काम करत आहे. भ्रष्टाचारमुक्त, गतिमान व पारदर्शक सरकार लोकांना देणे यालाच आपले प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले.
  
 
त्रिपुरा विधानसभेत काल सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी पार पडला. मुख्यमंत्री बिप्लव देव यांनी सर्व आमदारांचे त्यासाठी अभिनंदन केले आहे व सर्वांनी एकत्र मिळून राज्यातील जनतेसाठी काम करण्याचे आवाहनही केले आहे.
 
 
 
दरम्यान चरिलाम विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीचे निकाल काल जाहीर करण्यात आले. त्रिपुराचे उपमुख्यमंत्री जिष्णू देबबर्मा हे चरिलाममधून उभे होते. जिष्णू देबबर्मा तब्बल २५ हजार ५०० मतांच्या विक्रमी मताधिक्याने निवडून आले. मुख्यमंत्री बिप्लव देव व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी जिष्णू देबबर्मा यांचे या विजयाबद्दल अभिनंदन केले आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@