पाकिस्तानमध्ये हिंदुंवर सातत्याने अत्याचार : डॉ. भुट्टो

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Mar-2018
Total Views |

 
जिनेव्हा : सिंध प्रांतामधून हिंदूंना बाहेर काढण्यासाठी तसेच त्यांना नष्ट करण्यासाठी पाकिस्तानातील कडव्या इस्लामी लोकांकडून हिंदुंवर सातत्याने अत्याचार केले जात आहेत, असे वक्तव्य पाकिस्तानमधील मानवाधिकार चळवळीचे नेते डॉ. हिदायत भुट्टो यांनी केले आहे. संयुक्त राष्ट्र परिषदेच्या मानवधिकार संघटनेच्या जिनेव्हा येथे भरलेल्या ३७ व्या बैठकीमध्ये त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.
 
सिंध प्रांत हा पाकिस्तानसाठी एक प्रकारची लाईफलाईन आहे. परंतु या ठिकाणी हिंदू नागरिकांची मोठ्या प्रमाणात वस्ती असल्यामुळे त्यांना याठिकाणी हाकलून देण्यासाठी तसेच त्यांना नष्ट करण्यासाठी पाकिस्तानमधून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. हिंदूंनी हे स्थान सोडून द्यावे यासाठी सातत्याने त्यांच्यावर हल्ले केले जात आहे. हिंदूंच्या महिलांचे अपहरण करून त्यांचे जबरदस्तीने धर्मांतर देखील केले जाते, परंतु पाकिस्तान सरकार याकडे कसल्याही प्रकारचे लक्ष देत नाही. उलट मौन धारण करून येथे होणाऱ्या अत्याचारांना अप्रत्यक्ष पाठिंबा देत आहे, असे भुट्टो यांनी म्हटले.
 
तसेच यामागील खरे कारण म्हणजे पाकिस्तान या ठिकाणी आपला महत्त्वाकांक्षी प्रकल्प सिपेक (CPEC) राबवत आहे. त्यामुळे या ठिकाणाहून होणारा स्थानिकांचा विरोध रोखण्यासाठी हे असे प्रयत्न केले जात असल्याचे त्याने सांगितले. यासंबंधी त्यांनी एक उदाहरण देत गेल्या दोन दिवसांपूर्वीच पाकिस्तानमधील काही कडव्या इस्लामी संघटनांनी सिंधमधील एका स्थानिक नेत्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. परंतु हा नेता घरी नसल्यामुळे त्यांची पत्नी आणि मुलांचे यांनी अपहरण केले आहे. परंतु स्थानिक पोलीस आणि प्रशासन मात्र याकडे कसल्याही प्रकारचे लक्ष देत नाही, असे त्यांनी सांगितले.
 
@@AUTHORINFO_V1@@