जळगावात हजारो मुस्लीम महिलांचा मुक मोर्चाट्रिपल तलाक साठी महिला एकवटल्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Mar-2018
Total Views |

 

 
जळगावात हजारो मुस्लीम महिलांचा मुक मोर्चा
ट्रिपल तलाक साठी महिला एकवटल्या
 
 
जळगाव- 15 मार्च 
 
मुस्लीम महिला प्रोटेक्शन ऑफ राइट ऑन मॅरेज एॅक्ट 2017 हा कायदा लोकसभेत घाईघाईत मंजूर करण्यात आला आहे. या कयदा रद्द करण्यात यावा यासाठी 15 रोजी हजारो मुस्लीम महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक मोर्चा काढला . यामोर्चात शर्यत कायद्या संबधीचे फलक महिलांच्या हातात दिसून आले.
 
 
या कायद्याच्या मसुद्याला धार्मिक नेते आणि समाजातील बुध्दिवंतांशी सल्लामसलत केल्या शिवाय प्रक्रियेला पाठविले गेले आहे. ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डच्या नेतृत्वाखाली बुधवारी दुपारी 4 वा. खान्देश सेंट्रलच्या प्रांगणातून मूक मोर्चाला सुरवात झाली. कोर्ट चौक, नवीन बसस्थानक,स्वातंत्र्य चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालवर पोहचला.महिलांच्या शिष्ट मंडळाने जिल्हाधिका­यांची भेट घेवून तीन तलाक बील रद्द करण्यासाठी निवेदन दिले.
 
 
यावल मध्ये सुध्दा मुक मोर्चा
यावल शहरात वाजीद फाऊंडेशनच्यावतीने गुरूवारी शहरातुन महिलांनी मुक मोर्चा काढला गेला. सकाळी 11 वा. बरूज चौकात संस्थेचे पदाधिकारी व महिला एकत्र येवून तहसिल कार्यालवर हा मोर्चा गेला. ट्रिपल तलाख बील रद्द करण्यात यावे यासाठी महिलांच्या शिष्ट मंडळाने नायब तहसिलदार डॉ. योगीता ढोले यांना निवेदन देण्यात आले.
@@AUTHORINFO_V1@@