भारताला इसीसचा धोका नाही : राजनाथसिंह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Mar-2018
Total Views |



हरियाणा :
आशिया खंडासह संपूर्ण जगभरात आपली दहशत निर्माण केलेल्या इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेपासून भारताला कसल्याही प्रकारचा धोका नसल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी दिले आहे. हरियाणा येथे आयोजित 'काउंटर टेररिझम कॉन्फरन्स'च्या सत्रामध्ये त्यांनी ही माहिती दिली.

'जगभरात सध्या दहशतवाद अत्यंत वेगाने वाढत आहे. यामध्ये इसीसचा धोका हा सर्वात वेगाने वाढत आहे. जगभरातील तरुणांची दिशाभूल करून त्यांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी इसीस सोशल मिडीयाचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहे. त्यामुळे भारत सरकार सध्या यासाठी अत्यंत बारकाईने प्रत्येक गोष्टींवर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे इसीसपासून भारताला सध्या तरी कसल्याही प्रकारचा धोका नाही.' असे ते म्हणाले.

याच बरोबर तरुणांमध्ये वाढत चालेल्या कट्टरवादाविषयी मात्र त्यांनी चिंता व्यक्त केली. तसेच भारतीय समाजाला सर्वात अधिक धोका पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादापासून आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पाक पुरस्कृत दहशतवादापासून संरक्षणासाठी काही उपाय करणे हे अत्यंत गरजेचे असून भारत सरकार त्या दृष्टीने देखील सर्व प्रयत्न करत आहे, असे त्यांनी सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@