एकबोटे यांना १९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Mar-2018
Total Views |


पुणे : भीमा कोरेगाव प्रकरणी अटक करण्यात आलेले हिंदुत्ववादी नेते मिलिंद एकबोटे यांना १९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. भीमा कोरेगाव प्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर आज त्यांना पुणे सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांच्यावरील आरोप आणि पोलीस चौकशीला हजर न राहण्याच्या कारणावरून त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

दरम्यान भीमा कोरेगाव प्रकरणी काल रात्रीच एकबोटे यांना पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने एकबोटे यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी त्यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक केली होती. यासंबंधी विरोधी पक्षाच्या वकिलांनी एकबोटे हे पोलीस चौकशीला सामोरे जात नसल्याचे तसेच पोलिसांना सहकार्य करत नसल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला होता, त्यामुळे आज सकाळी एकबोटे यांना न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश पुणे सत्र न्यायालयाने दिले होते.

गेल्या १ जानेवारीला भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीमध्ये एकबोटे यांचा हात असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. भीमा कोरेगाव येथील स्मारकाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या समुदायावर काही समाजकंटकांनी दगडफेक केली होती, तसेच त्याठिकाणी झालेल्या हिंसाचारामध्ये एका युवकाचा मृत्यू झाला होता. या हिंसाचारला एकबोटे आणि संभाजी भिडे हे दोघे जबाबदार असून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी आंबेडकरी चळवळींकडून करण्यात येत होती.
@@AUTHORINFO_V1@@